करमाळा-प्रतिनिधी
जवळा ता. जामखेड येथील चंद्रभागा कुशाबा आव्हाड यांचे वयाच्या ६५ व्या वर्षी अल्पशा आजाराने राहत्या घरी, दि. १८ जुलै २०२३ रोजी रात्री २ वा. ३० मी. अचानक निधन झाले आहे. त्या अत्यंत प्रेमळ व बोलक्या स्वभावाच्या होत्या. गावामधील ओळखीच्या व्यक्तींची विचारपूस करुन, त्यांना वेळोवेळी जुन्या काळातील आठवणी करुन देऊन चांगले राहणे, वागणे याबद्दल नेहमी सांगत असत. त्यामुळे अनेक जण सह्रदयतेने त्यांच्याकडे सहजासहजी जाऊन जुन्या-नव्या गोष्टी जाणून घेण्यासाठी प्रेमाने येत असत. त्यांच्या निधनाने संपुर्ण गावाने हळहळ व्यक्त केली आहे. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा भलामोठा परिवार सौ. चंद्रभागा आव्हाड यांच्या निधनाने संपुर्ण आव्हाड व कांबळे परिवारावर दुखाःचा डोंगर कोसळला आहे. त्या झांगडू चित्रपटाचे लेखक रंगनाथ आव्हाड यांच्या आई होत्या.


Post a Comment