Header Ads Widget

 


करमाळा-प्रतिनिधी
       करमाळा पोलीस स्टेशन येथे मोहरम निमित्त शांतता कमिटीची बैठक पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांच्या प्रमुख उपस्थित पार पडली. यावेळी शिवसेना नेते संजय शिंदे, नगरसेवक शौकत नालबंद, करमाळा अर्बन बँकेचे माजी उपाध्यक्ष फारुक जमादार, अलसहारा सोशल ग्रुपचे संस्थापक हाजी समीर शेख, जाकीर वस्ताद, सारंग परदेशी, बबन दुधाट, मैनुद्दीन निजाम शेख, बिलाल कुरेशी, सिंकदर सय्यद उमर मदारी ,देवीदास घोडके, सद्दाम मुबारक शेख, ओंकार परदेशी आदी जण उपस्थित होते.
           यावेळी पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे म्हणाले की, सर्व हिंदू-मुस्लिम बांधवांनी मोहरमचा सण हा शांततेत साजरा करुन, समाजापुढे एक आदर्श निर्माण करा. दिलेल्या वेळेतच सवारीची मिरवणूक काढावी असे ते यावेळी म्हणाले. कार्यक्रमाच्या शेवटी पोलीस गणेश दळवी यांनी आभार मानले.


Post a Comment