करमाळा-प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील युवकांनी तालुक्यामध्ये होत असलेल्या विकासकामांवर करडी नजर ठेवावी. असे आवाहन मनसे तालुकाध्यक्ष संजयबापू घोलप यांनी केले आहे. तालुक्यामध्ये होत असलेली विविध ठिकाणची कामे हि नियमानुसार होतात का नाही? याकडे बारीक लक्ष द्यावे. अनेक गावांमध्ये विविध कामांसाठी सरकारकडुन लाखो, करोडो रूपये निधी वितरित केला जात आहे. यामध्ये विविध योजनांतर्गत रस्ते, वीज, पाणी, बांधकाम अशी कामे होत आहेत. परंतु या कामांवर तालुक्यातील कोणत्याच लोकप्रतिनिधीचा अंकुश नसल्यामुळे, सदरची कामे निकृष्ट दर्जाची होत आहेत. जनतेच्या पैशातुन वसुल केलेल्या टॕक्समधून सदरची सर्व कामे होत असतात. परंतू आपल्या भरलेल्या टॕक्सच्या पैशाचा वापर फक्त ठराविक माणसांची घरे भरण्यासाठी केला जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. कोणते ही काम सुरु करण्यासाठी व त्या कामाचे टेंडर निघेपर्यंत वर्षेनुवर्ष वाट बघावी लागते. मंजूर झालेल्या कामांवर तालूक्यातील जनतेने योग्य प्रकारे लक्ष दिले नाही. तर कित्येक वर्ष अनेक कामे विविध गावांमध्ये रखडून पडल्याची आजची परिस्थिती आहे. तालूक्यातील लोकप्रतिनिधी व अधिकारी ठेकेदारांकडून होणाऱ्या कामांवर दुर्लक्ष व डोळेझाक करताना दिसतात. त्यामुळे आता हि जबाबदारी तालुक्यातील सुजान नागरीक व युवकांनी स्वतः लक्ष घालुन, तालुक्यामध्ये होत असलेली विविध ठिकाणची कामे प्रस्तावित खर्चानूसार दर्जेदार होत आहेत कि नाही? याकडे करडी नजर ठेवून बघण्याची वेळ आली आहे. जर तालुक्यामध्ये विविध ठिकाणी होत असलेली कामे प्रस्तावित खर्चानूसार होत नसतील. तसे जर कोणाला आढळले, तर संबंधितांनी थेट अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. व अशा वेळेस काही अडचण आल्यास तक्रारदारांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांशी खालील मो. नं. 9011148077 वर संपर्क साधावा. असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेना करमाळाच्या वतीने करण्यात आले आहे.




Post a Comment