Header Ads Widget

 


 करमाळा-प्रतिनिधी  

          नोबल इंग्लिश मिडियम स्कुलने वन संवर्धन दिनानिमित्त करमाळा येथील माळढोक पक्षी अभयारण्यास भेट देऊन, त्याठिकाणी वृक्षारोपण हि केले. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी अभयारण्य भेटीसाठी सर्वांनी उत्सुकतेने शाळेत हजेरी लावली होती. सदरच्या अभयारण्य भेटी दरम्यान विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी, वनविभागाचे शिंदे, आदलिंगे मॕडम, झिरपे, शेख व रेगुडे या अधिकाऱ्यांनी प्रमुख उपस्थिती लावली होती. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांचा शाळेच्या वतीने सह्रदय सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना वनविभागाचे अधिकारी शिंदे यांनी माळढोक पक्षी अभयारण्याविषयी माहिती देताना सांगितले कि, सध्या संपुर्ण महाराष्ट्रात एकुण १५ माळढोक पक्षी असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. माळढोक पक्षी उडत असताना विमानाप्रमाणे उडान घेतो. त्याचप्रमाणे तो वर्षातुन फक्त एकदाच आणि एकच अंडे घालतो. अशा अंड्याचे संरक्षण करुन त्यापासुन नामशेष होत असलेल्या माळढोकच्या उत्पत्तीकडे जातीने लक्ष देणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे निसर्गाचा समतोल राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करणे सुध्दा आता गरजेचे बनले आहे. असे प्रतिपादन शिंदे यांनी मांडले. 

        यावेळी अभयारण्यामध्ये शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांना वृक्षाचे महत्त्व कळावे, यासाठी वृक्षारोपण हि करण्यात आले. त्याचप्रमाणे निसर्गाचा समतोल राखण्यासाठी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी आप-आपल्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करणार असल्याचा सुध्दा निर्धार केला.
             सदरच्या अभयारण्य भेटीसाठी संस्थापिका सौ. आसादे मॕडम यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापिका सौ. शितल वाघमारे मॕडम, सौ.रजनी साळूंखे मॕडम, विद्या एकतपुरे मॕडम, सौ. मंगल जगताप मॕडम, सौ. सुनंदा दुधे मॕडम, सौ. वंदना बंडगर मॕडम, सौ. सपना अडसुळ मॕडम, सौ. सविता माने मॕडम, सौ. किर्ती पाचकवडे मॕडम, दिक्षा गायकवाड मॕडम, शुभांगी भोसले मॕडम यांनी नियोजन करुन, सदरचा उपक्रम योग्य प्रकारे यशस्वी केला.

Post a Comment