Header Ads Widget

 


करमाळा-प्रतिनिधी
              करमाळा तालुक्यातील श्री मकाई सहकारी साखर कारखाना, भैरवनाथ साखर कारखाना व कमलाई साखर कारखान्याला तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ऊस दिला होता. त्याअनुषंगाने शेतकऱ्यांना काही दिवसांमध्ये ऊसाचे बील मिळणे अपेक्षित होते. परंतु ऊसाची बीले शेतकऱ्यांना मिळाली नसल्यामुळे, बऱ्याच दिवसांपासुन विविध शेतकरी संघटना आंदोलनाचे इशारे देत आहेत. त्याच धर्तीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ही आता भुमिका घेत, शेतकऱ्यांची ऊस बीले व्याजासहीत मिळावीत. अन्यथा संघटनेच्या वतीने रस्त्यावरील आंदोलने तसेच कायदेशीर लढाई लढली जाईल. असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करमाळा तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातुन देण्यात आला आहे. तरी दिलेल्या निवेदनातुन खालील प्रमाणे मागणी करण्यात आली आहे.
              करमाळा तालुक्यातील मकाई सहकारी साखर कारखाना, कमलाई साखर कारखाना व भैरवनाथ साखर कारखाना हे शेतकऱ्यांच्या जीवावर उभे राहिलेले साखर कारखाने असून, या कारखान्यांचा 2022/23 गाळप हंगाम पूर्ण झालेला आहे. या कारखान्यांकडे शेतकऱ्यांची एफ.आर.पी. व वाहन मालक यांचे कमी-जास्त 40/45 कोटी पर्यंत देणे बाकी आहे. तरी शेतकऱ्यांची एफ.आर.पी. ही 14 दिवसांच्या आत देणे बंधनकारक असून, जर त्या कारखान्याने 14 दिवसांच्या आत शेतकऱ्यांची एफ.आर.पी. दिली नाही. तर पुढील दिवसांचे 14 टक्के प्रमाणे व्याज हे शेतकऱ्यांना देणे बंधनकारक आहे. परंतु हंगाम संपून तीन ते चार महिने उलटले, तरी ही शेतकऱ्यांची बिले देण्यात आलेली नाहीत. तरी संबंधित कायद्याअंतर्गत मकाई सहकारी साखर कारखाना, कमलाई प्रा.लि. साखर कारखाना व भैरवनाथ साखर कारखाना यांनी शेतकऱ्यांची देणी लवकरात-लवकर व्याजासहित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावीत. अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी आहे. व शेतकऱ्यांची देणी व्याजासहित न दिल्यास, स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावरील व कायदेशीर लढाई लढण्यास तयार आहे. अशा प्रकारच्या इशारा निवेदनातुन देण्यात आला आहे. 

          तरी सदरील निवेदनावर रवी गोडगे- सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष, दिपक शिंदे- जिल्हा उपाध्यक्ष, सुदर्शन शेळके- करमाळा ता. अध्यक्ष, अमोल घुमरे- युवा ता. अध्यक्ष, बापू फरतडे- ता. पक्षाध्यक्ष, तानाजी शिंदे- ता. उपाध्यक्ष, बापू वाडेकर- ता. युवा उपाध्यक्ष, अशोक लवंगारे- शाखाध्यक्ष जातेगाव, बलभिम धगाटे सर- शेतकरी, बाबाजान खान- शेतकरी इ. पदाधिकारी व शेतकरी यावेळी उपस्थित होते.

Post a Comment