Header Ads Widget

 


करमाळा-प्रतिनिधी
 
         करमाळा येथील नोबल इंग्लिश मिडियम स्कुल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या संस्थापिका आसादे मॕडम ह्या होत्या. तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाराजांच्या प्रतिमेला उपस्थित शिक्षक व कर्मचारी वर्गाने पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शितल वाघमारे यांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची कल्पकता आणि रयतेला ते कशाप्रकारे न्यायदानाचे काम करत होते. याचप्रमाणे महाराजांचे आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारांचे, आचारांचे आणि कर्तृत्वाचे नाते किती घट्ट होते. याचे सखोल विश्लेषण सौ. वाघमारे मॕडम यांनी विद्यार्थ्यांना करुन दिले. तर अध्यक्षस्थानावरुन बोलताना सौ. आसादे मॕडम यांनी विद्यार्थ्यांना सांगितले कि, आज आपल्याला विविध महापुरुषांची जयंती का साजरी करावी लागते? आज आपण विविध क्षेत्रामध्ये अग्रेसर होत असताना, मागे वळून पाहत असताना परत आपल्या महापुरुषांच्याच विचारांची गरज का पडते? आपल्याला या महापुरुषांनी केलेल्या कार्यावरुन आणि विचारांवरुनच आपली प्रगती करावी लागणार आहे. अशाप्रकारे प्रेरणादायी मार्गदर्शन सौ. आसादे मॕडम यांनी केले.

           सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या संस्थापिका सौ. आसादे मॕडम यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापिका सौ. शितल वाघमारे, धुमाळ सर, सौ. लतिका धुमाळ मॕडम, सौ.रजनी साळुंके मॕडम, विद्या एकतपुरे मॕडम, सौ. वंदना बंडगर मॕडम, सौ. मंगल जगताप मॕडम, स्नेहा चराते मॕडम, परदेशी मॕडम, माने मॕडम, जाधव सर यांनी योग्य नियोजन करुन सदरील कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला. तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मंगल जगताप मॕडम यांनी मानले.

Post a Comment