करमाळा-प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील साखर कारखान्यांनी मागील गळीत हंगामातील उसाची बिले 30 जून पर्यंत न दिल्यास, एक जुलैला कारखान्याच्या चेअरमन च्या घरासमोर 'ढोल बजाव आंदोलन' केले जाईल. असा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष अण्णासाहेब सुपनवर यांनी दिला आहे. करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना कुणीही वाली नसल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. मागील गळीत हंगामातील ऊस गाळप करून, व ऊस गाळप बंद होऊन सात ते आठ महिने झाले. तरीही अजून उसाचे एफ.आर.पी.प्रमाणे बिल शेतकऱ्याला दिलेले नाही. या साखर सम्राटांना जाग अन्यासाठी 'ढोल बजाव आंदोलन' केल्याशिवाय पर्याय नाही. तरी या गेंड्याच्या कातडीचे व झोपेचे सोंग घेणाऱ्या साखर सम्राटांना जाग अन्यासाठी, करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी एकजुटीने यांना सळो कि पळो करून सोडल्याशिवाय स्वस्त बसायचे नाही. अशी शेतकऱ्यांची परिस्थिती निर्माण झालेली आहे. करमाळा तालुक्यातील शेतकरी हातबल झालेला आहे. कोणी ही शेतकऱ्यांना उधार बाजार सुध्दा देत नाही. खरीप हंगाम चालू झाला असून शेतकऱ्यांना बी बियाणे खत घेण्यासाठी, बाजारामध्ये पैसे उपलब्ध न झाल्यामुळे शेतकरी सावकाराकडे जाऊ लागला आहे. करमाळा तालुक्यातील कारखानदारांनी 30 जून पर्यंत शेतकऱ्यांना एफ.आर.पी.प्रमाणे उसाचे बिल न दिल्यास, बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने कारखान्याच्या चेअरमनच्या घरासमोर 'ढोल बजाव आंदोलन' केले जाईल. अशाप्रकारे बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने इशारा देण्यात आला आहे. यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष शिवाजी बनकर, आजिनाथ इरकर, अनिल तेली, नवनाथ कोळेकर, तात्यासाहेब काळे, कैलास पवार, अनिल थोरात, ॲडव्होकेट नामदेव खताळ, नामदेव पालवे, सोपान पवार, आजिनाथ भागडे, रियाज मुलाणी, विशाल पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.



Post a Comment