Header Ads Widget

 


करमाळा-प्रतिनिधी
 
           पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी कविता कुंडलिक कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. कविता कांबळे या मूळच्या वाशिंबे ता.करमाळा येथील रहिवासी असून, सध्या चिखलगाव ता. मुळशी येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्या शिक्षक समितीच्या तालुका संघटक म्हणून गेली चार वर्ष कार्यरत असून, त्यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच त्यांचे पती कुंडलिक कांबळे मुळशी तालुका शिक्षक समितीचे सरचिटणिस आहेत. 

          पुणे जिल्ह्यातील शिक्षकांना आर्थिक स्थैर्य मिळावे, शिक्षक समिती वाढावी. ह्या उद्धात हेतूने काम करणार असल्याचे कांबळे यांनी सांगितले. या निवडीबद्दल मकाई सहकारी साखर कारखाना संचालक गणेश झोळ व वाशिंबे ग्रामस्थांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment