करमाळा येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर करमाळा नगर परिषदेच्या शाळेमध्ये छत्रपती राजर्षी शाहु महाराज यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शिलराज कांबळे व विशाला जाधव यांच्या वतीने शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती राजर्षी शाहु महाराज यांच्या प्रतिमेला उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिलराज कांबळे (S.M.C.अध्यक्ष) हे होते. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना पत्रकार सुनिल भोसले यांनी मार्गदर्शन करताना सांगितले कि, सर्व विद्यार्थ्यांनी छत्रपती शाहू महाराजांचा सर्वधर्मसमभाव व इतर कार्याचा आदर्श घ्यावा. असे प्रकारे भोसले यांनी साआगितले. यावेळी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य ल खाऊ वाटप करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी डॉ. तुषार, डॉ. शिवानी पाटील, बाळू शिंदे, श्रीकांत कांबळे, डॉ.भोसले, विशाल जाधव (भिम टायगर ग्रुप-अध्यक्ष), राहुल कांबळे, सौ.पल्लवी कांबळे, पत्रकार सिद्धार्थ वाघमारे, बबलू कांबळे, लक्ष्मण अडसूळ, (S.M.C.सदस्या) सौ.पल्लवी जाधव व शिक्षिका श्रीम.मालन शेख मॅडम इत्यादी जण उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक राऊत सर यांनी केले तर दिपक जाधव यांनी आभार मानले.



Post a Comment