Header Ads Widget

 


करमाळा-प्रतिनिधी
               शिवसेना (ठाकरे गट) 57 व्या वर्धापन दिनानिमित्त व माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसा निमीत्त करमाळा तालुका युवासेना व शिवसेना यांच्या वतीने, करमाळा नगरीमध्ये येणाऱ्या सर्व वारकरी विठ्ठल भक्तांचे स्वागत करुन, करमाळा शहराजवळील मौलाली माळाजवळ पंढरपूरकडे आषाढी एकादशी निमित्त पायी चालत जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी चहाची व पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती.
          या कार्यक्रमाचे आयोजन करमाळा युवासेना तालुका समन्वयक कुमार माने यांच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी युवासेनेचे जिल्हा सचिव आदेश बागल, करमाळा शहर युवासेना उपशहरप्रमुख आदित्य जाधव, नितीन परदेशी, नवनाथ माने, लखन ननवरे, निलेश पवार, बुवासाहेब धनवे, सागर माने, राहुल घाडगे, ख्वाजा कुरेशी, गालीब कुरेशी व इतर सदस्य उपस्थित होते. 

Post a Comment