Header Ads Widget

 


करमाळा-प्रतिनिधी
           करमाळा तालुक्यातील चिखलठाण ग्रामपंचायतीचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपल्यामुळे, येथे शासनामार्फत प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. जोपर्यंत ग्रामपंचायतीची निवडणुक जाहिर होत नाही. तोपर्यंत सदरील ग्रामपंचायतीचा संपुर्ण कारभार शासनाने नियुक्त केलेल्या प्रशासकामार्फत चालविला जातो. याच अनुषंगाने चिखलठाण ग्रामपंचायतीत प्रशासक नेमण्यात आला आहे. परंतु येथे प्रशासक आणि ग्रामसेवक फक्त नावापुरते राहिले आहेत. 

          कारण येथे प्रशासक असताना सुध्दा ग्रामपंचायतींच्या शासकीय कामांचे भुमिपुजन, उद़्घाटन माजी सरपंचाच्या हस्ते करण्यात येते. गावासाठी मंजूर झालेल्या शासनाच्या जलजीवन मिशन योजनेचे भुमीपुजन, १५ व्या वित्त आयोगाचा आराखडा सुध्दा माजी सरपंचाच्या सहाय्याने तयार केला जात आहे. त्याचप्रमाणे गावची ग्रामपंचायत संपुर्णतः प्रशासक आणि ग्रामसेवकाच्या ताब्यात असताना सुध्दा, येथे माजी सरपंच दररोज त्यांच्या कार्यकर्त्यांना घेऊन सरपंचाच्या खुर्चीवर बसतात. त्याचप्रमाणे येथे पार्ट्या, कार्यकर्त्यांचे वाढदिवस आणि विविध कार्यक्रम राजरोसपणे दररोज प्रशासक आणि ग्रामसेवकाच्या समोर सुरु असतात. त्याचप्रमाणे ग्रामस्थांना माजी सरपंच ग्रामपंचायतीमध्ये बसुन, येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने वेगवेगळी अमिषे दाखवत आहेत. 

        तरी या सर्व चुकीच्या बाबींवर गटविकास अधिकारी, सोलापूर जिल्ह्याचे C.O., विस्तार अधिकारी यांनी वेळीच लक्ष द्यावे. यासाठी आम्ही येत्या सोमवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदने सुध्दा देणार आहोत. तरी ग्रामपंचायतीमधील सरपंचाच्या खोलीला तातडीने कुलूप लावावे. व वेळीवेळी ग्रामसेवक आणि प्रशासक अशा चुकीच्या गोष्टींना पाठिशी घालत असल्याबद्दल त्यांच्यावर सुध्दा शासनस्तरावर योग्य ती कार्यवाही करण्याची आमची मागणी आहे.


Post a Comment