Header Ads Widget

 


करमाळा-प्रतिनिधी
 
            करमाळा तालुक्यामधील सहा ग्रामपंचायतीतील सरपंच, उपसरपंच, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन तसेच तंटामुक्तीचे अध्यक्ष यांचा करमाळा भाजपामध्ये, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर प्रवेश झालेला आहे. दि 25 मे रोजी सोलापूर येथील हेरिटेज हॉल येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये महाविजय कार्यकर्ता संमेलन घेण्यात आले होते. यावेळी या संमेलनामध्ये सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, डॉ. खा. जयसिध्देश्वर महास्वामी, मा, पालकमंत्री विजय देशमुख, खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, मा. मंत्री सुभाष देशमुख, आ. समाधान आवताडे, आ. राम सातपुते, आ. प्रशांत परिचारक, भाजपा सोलापूर जिल्हाध्यक्ष आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. रणजितसिंह मोहिते-पाटील तसेच जिल्ह्यातील भाजपाच्या विविध पदधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने या संमेलनासाठी उपस्थिती लावली होती. याच अनुषंगाने करमाळा भाजपा तालुका अध्यक्ष गणेश चिवटे यांनी सुद्धा मोठे शक्ती प्रदर्शन करत, सोलापूर येथील महाविजय कार्यकर्ता संमेलनामध्ये उपस्थिती लावली होती. सोलापूर जिल्ह्यातील भाजपाच्या सर्वच प्रमुख पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाला मोठी गर्दी केली होती. 

            या सर्वांच्या उपस्थितीमध्ये जातेगाव ग्रामपंचायत सरपंच छगन ससाने, पोफळज ग्रामपंचायत उपसरपंच बिभीषण गव्हाणे, कोंढेज ग्रामपंचायत उपसरपंच पांडुरंग लोंढे, विविध कार्यकारी सोसायटी झरे चेअरमन तसेच ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ घाडगे, विविध कार्यकारी सोसायटी गुळसडी चेअरमन व गुळसडी ग्रामपंचायत सदस्य महावीर कळसे, वरकटणे ग्रामपंचायत सरपंच बापूसाहेब तनपुरे, विविध कार्यकारी सोसायटी वरकटणे चेअरमन व तंटामुक्ती अध्यक्ष अण्णासाहेब देवकर या सर्वांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये करमाळा भाजपामध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे. त्याचप्रमाणे याआधी ही करमाळा तालुक्यामधून भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात इतर पदाधिकाऱ्यांचा जाहिर प्रवेश झालेला होता. त्यांचेही यावेळेस उपस्थितांकडून स्वागत करण्यात आले.


Post a Comment