Header Ads Widget

 


करमाळा-प्रतिनिधी
               करमाळ्यातील जि.प. बांधकाम हद्दीतील बऱ्याच दिवसांचा प्रलंबित प्रश्न दत्त मंदिर ते कोर्ट रस्ता डांबरीकरण कामाचा पाठपुरावा करून, मार्गी लावल्याबद्दल उप अभियंता गोढरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना करमाळा यांच्या वतीने सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. तसेच गोंढरे यांनी रस्त्याच्या कडेला गटारीची व्यवस्था करण्यासाठी पाठपुरावा करावा. तरच हा रस्ता टिकेल अशा प्रकारची मागणी हि यावेळेस मनसेच्या वतीने करण्यात आली. या विनंतीवरुन गोंढरे यांनी सदरील मागणीचा विचार करुन लवकरच पाठपुरावा करु. व त्याचे पण काम चालु करू असे सांगितले. यावेळी संजय घोलप मनसे तालुकाध्यक्ष करमाळा, दिपक थोरबोले उपसरपंच देवीचामाळ, शहाजी झिंजाडे इ. जण मान्यवर उपस्थित होते.


Post a Comment