करमाळा-प्रतिनिधी
हिंदुसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंती निमित्त 'सकल क्षत्रिय राजपुत समाज, करमाळा'च्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानुसार रविवार दि.२१ मे रोजी सकाळी ९ ते ५ वाजेपर्यंत सुतारगल्ली येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार दि. २२ मे रोजी सकाळी ८.३० वा. मंगळवार पेठ येथील महाराणा प्रतापसिंह यांच्या पुतळ्यास महाअभिषेक सोहळा होणार आहे. यानंतर सकाळी ९.३० वा. सामाजिक उपक्रमात सहभागी युवकांसाठी लकी ड्ॉ काढण्यात येणार आहे. यासोबतच दु.१२ ते ३ वाजेपर्यंत सुतारगल्ली येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. याच दिवशी दुपारी ४ वाजता सुतारगल्ली येथून आकर्षक सजावट केलेल्या रथातून महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. सदरील मिरवणुकीमध्ये विविध नामांकित वाद्यवृंद (बँड) सह विविध हालगी ग्रुप, घोडे इत्यादी प्रमुख आकर्षण असणार आहे. तरी शहरातील सर्वच समाजबांधवांनी या कार्यक्रमांना उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी. असे आवाहन हिंदुसुर्य महाराणा प्रतापसिंह उत्सव समिती, करमाळा यांच्या वतीने करण्यात आले आहे.



Post a Comment