Header Ads Widget

 


करमाळा-प्रतिनिधी
              राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 298 व्या जयंती करमाळा शहरामध्ये विविध कार्यक्रमाने साजरी करण्यात येणार आहे. दि. ०२/०६/२०२३ शुक्रवारी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक, दुपारी चार वाजता दत्त मंदिर कॉटेज पासून सुरू होईल. प्रतिमेचे पुजन करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांच्या शुभहस्ते होणार असुन, प्रमुख उपस्थिती करमाळा तहसीलदार विजयकुमार जाधव, करमाळा पंचायत समिती गटविकास अधिकारी मनोज राऊत, करमाळा कृषी अधिकारी संजय वाकडे, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता उबाळे इ.जण जयंतीच्या अनुषंगाने उपस्थित राहणार आहेत.
         मिरवणुकीचे खास आकर्षण म्हणजे धनगरी गजे ढोल, वारकरी संप्रदायातील टाळ खेळणे, विविध वाद्यांमध्ये मिरवणूक मोठ्या प्रमाणात निघणार आहे. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन संघर्षातून धनगर व बहुजन समाजाने घ्यावयाची प्रेरणा या विषयावर ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येणार आहे. तरी सदरील स्पर्धा 27/5/2023 ते 2/6/2023 या कालावधीमध्ये घेण्यात येणार आहे. तरी या स्पर्धेसाठी पुढीलप्रमाणे बक्षीसे ठेवण्यात आली आहेत. प्रथम बक्षीस 2100 रुपये, द्वितीय बक्षीस 1500 रु., तृतीय 1100 रु. ठेवण्यात आलेले आहे. तरी वरील विषयावर स्वतःच्या वक्तृत्वाचा व्हिडिओ महाराष्ट्र राज्य धनगर समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष अण्णासाहेब सुपनवर यांच्या मो. नं. 9112920531 या क्रमांकावर व्हाट्सअप किंवा टेलिग्रामच्या माध्यमातून पाठवावेत. तरी सदरील स्पर्धेचा निकाल 5/6/2023 रोजी जाहीर केला जाईल.

Post a Comment