करमाळा-प्रतिनिधी
दूध उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारने प्रतिलिटर 10 रु. सानुग्रह अनुदान द्यावे. अशी मागणी जनसंघर्ष समितीचे अध्यक्ष तथा भाजपचे नितीन झिंजाडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे एका निवेदनद्वारे केली आहे. या निवेदनात म्हटले आहे कि, राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचा रोष राज्य सरकारवर वाढवण्यासाठी, राज्यातील खाजगी दूध संघांनी मनमानी पद्धतीने ऐन उन्हाळ्यात शेतकऱ्यांडून घेण्यात येणाऱ्या दूध खरेदी दरात, 10 दिवसात दोन वेळा मोठी दर कपात केली आहे. त्यामुळे दुध उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न व खर्चाचे गणित कोलमडले आहे. आजच्या घडीला नवीन दुभती जनावरे तसेच जनवरांसाठी लागणारा चारा, पशूखाद्य व औषधोपचार यांचे दर खुपच वाढले आहेत. अशातच खाजगी दूध संघांनी मनमानी करत दुध खरेदी दर कमी केले. यामुळे दूध उत्पादक शेतकरी पुरता कोलमडला आहे. याशिवाय पावसाळ्यात आणखी दर कमी होण्याचं संकट आहेच. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना थेट प्रतिलिटर 10रु. अनुदान लवकरात-लवकर द्यावे. तसेच राज्यातील खाजगी दूध संघ राज्य सरकारच्या नियंत्रणात आणावेत. जेणेकरून दूध खरेदी दर सदर संस्थांना राज्य सरकारच्या आदेशाशिवाय परस्पर कमी करता येणार नाहीत. अशी मागणी करण्यात आली आहे.



Post a Comment