Header Ads Widget

 


करमाळा-प्रतिनिधी
            भारतीय जनता पार्टी करमाळा विधानसभा मतदारसंघाची बुथ सशक्तिकरण अभियान आढावा बैठक पश्चिम महाराष्ट्र विभाग बुथ संयोजक योगेश बाचल यांच्या प्रमुख उपस्थितीत व तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाली. या बैठकीत बूथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख यांना माढा लोकसभा संयोजक जयकुमार शिंदे ,सोलापूर जिल्हा संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते- पाटील, पश्चिम महाराष्ट्र विभाग बुथ संयोजक योगेश बाचल, सोशल मीडिया प्रमुख प्रकाश गाडे यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीस प्रमुख उपस्थिती म्हणून करमाळा विधानसभा प्रभारी शिवाजी कांबळे, जिल्हा सरचिटणीस किरण बोकन, माढा तालुका अध्यक्ष योगेश बोबडे, लोकसभा विस्तारक शरद झेंडे, माढा तालुका युवा मोर्चा अध्यक्ष उमेश पाटील, बाळासाहेब कुंभार उपस्थित होते.
          या बैठकीमध्ये तालुका अध्यक्ष गणेश चिवटे यांचे नेतृत्व मान्य करून, देवळाली गावचे माजी उपसरपंच संदिपान कानगुडे, टाकळीचे युवा नेते महाराष्ट्र चॅम्पियन धनंजय गोडसे, वीट गावचे युवा नेते हरिभाऊ आवटे ,विहाळ ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य शिवाजी नाळे, अक्षय भुजबळ तसेच राष्ट्रवादी पदवीधर संघाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य नितीन झिंजाडे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कामगार सेलचे करमाळा तालुकाध्यक्ष चंद्रकांत जगदाळे, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष ,गणेश कांबळे राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे सोलापूर तालुका उपाध्यक्ष अनिल आरणे, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे सोलापूर तालुका उपाध्यक्ष राजू पवार, राष्ट्रवादी किसान सेलचे शिवाजी शिंदे, गणेश वाळुंजकर, आप्पासाहेब खटके, यशवंत झिंजाडे, भारत पाटील, पिनू ठोंबरे, अनिकेत रणवरे, शांतीलाल झिंजाडे, हरिभाऊ शिंदे, अक्षय झिंजाडे या सर्वांनी त्यांच्या समर्थकास भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ नेते भगवानगिरी गोसावी यांनी केले. या बैठकीसाठी करमाळा विधानसभा मतदारसंघातील बुथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

              राष्ट्रवादीच्या ज्या मुख्य पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांनी पक्ष सोडण्यापुर्वी माझ्याशी कोणत्याही प्रकारे चर्चा केली नाही. त्यांची नाराजी जर वेळीच कळली असती तर, अवश्यच त्यांची नाराजी वरिष्ठांकडून दुर करण्यासाठी सकारात्मक चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न केला असता. परंतु प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे, पक्षामध्ये येणे आणि जाणे हे सतत होत असते. सदरील कार्यकर्त्यानी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. ते निष्ठावान कार्यकर्ते होते. २०१९ विधानसभेच्या तोंडावर पक्षाच्या पडझडीच्या काळात या कार्यकर्त्यांनी पक्षाचे निष्ठेने काम केले होते. या कार्यकर्त्यांना पक्ष न्याय देण्यासाठी कुठेतरी कमी पडला आहे. याचे आम्ही आत्मचिंतन करु, तरी यांच्या जाण्याने पक्ष संघटनेमध्ये मोठी दुफळी निर्माण झालेली आहे. असे कार्यकर्ते पक्ष सोडून जाणे म्हणजे जिल्हा पातळीवरील नेत्यांनी याची गांभीर्याने दखल घेऊन करमाळा तालुक्यामध्ये पक्ष बांधणीसाठी लक्ष घालणे गरजेचे आहे. अजुन हि वेळ गेलेली नाही. पक्षाच्या पडझडीच्या काळात जे कार्यकर्ते पक्षासोबत होते. त्यांना न्याय देण्याची गरज आहे. असे निष्ठावान कार्यकर्ते न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. तरी जिल्हा नेतृत्वाने वेळीच लक्ष घालून त्यांना न्याय देणे गरजेचे बनले आहे.

हनुमंत मांढरे-पाटील (राष्ट्रवादी करमाळा ता. अध्यक्ष)

Post a Comment