Header Ads Widget

 


करमाळा-प्रतिनिधी
              करमाळा तालुक्यात झालेली अतिवृष्टी व त्यात झालेले शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, त्या नुकसानीची भरपाई मिळावी. या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना सातत्याने प्रयत्न करत होती. त्या प्रयत्नांना थोडेफार यश आलेले आहे. व सरकारने करमाळा सर्कल, कोर्टी सर्कल व केतुर सर्कल ही तीन सर्कल वगळून शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत जमा करण्यास सुरुवात केली आहे. परंतु यातील सर्कल मध्येही शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. या शेतकऱ्यांना ही याचा मोबदला मिळावा. या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने काल तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
        निवेदन देतेवेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र गोडगे, जिल्हा उपाध्यक्ष दीपक शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष भाऊ झोळ, प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष संदीप तळेकर‌, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष सुदर्शन शेळके‌, तालुका युवा अध्यक्ष अमोल‌ घुमरे, तालुका पक्ष अध्यक्ष बापू फरतडे‌, स्वाभिमानी नेते अण्णासाहेब झोळ, जातेगाव ग्रामपंचायत सदस्य प्रमोद वारे, तुषार शिंदे, सागर शिंदे, राज पाटील, दिलीप काकडे, अमित पाटील, बाळू शिंदे‌, भैरवनाथ निगडे व इतर शेतकरी उपस्थित होते.

Post a Comment