जेऊर-प्रतिनिधी
जेऊर येथे संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने भगवान महावीर जयंती निमित्त प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी महावीर जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्याशोभायात्रेचे मोठ्या उत्साहामध्ये स्वागत करण्यात आले. त्याचप्रमाणे जयंतीमधील सर्वच बांधवांना शितपेय व पाणी बॉटलचे संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने वाटप करण्यात आले. यावेळी पुणे विभागीय अध्यक्ष नितीन खटके म्हणाले कि, भगवान महावीरांचे अहिंसा आणि अपरीग्रह या दोन महान मानवी मूल्यावर सकल जैन धर्मियांचे विचार मानव जातीला दीपस्तंभा प्रमाणे मार्गदर्शक आहेत. सुखी समाधानी जीवन ही प्रत्येकाची आकांक्षा असते. व त्यासाठी सुख साधनाची आवश्यकता असते. परंतु केवळ साधने संपादित केल्याने सुख प्राप्त होत नाही यासाठी साधनांच्या बाबतीत सम्यक विचार महत्त्वाचा ठरतो. भगवान महावीरांचा दुसरा महत्त्वाचा विचार हा अत्यंत मुलगामी व अहिंसा सर्व स्तरावर स्वीकारण्यावर भर देतो. असे खटके यांनी सांगितले. यावेळी उपस्थित जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्ष पल्लवी शिंदे, राणी पाटील, प्रियंका खटके, मीनाक्षी पाटील, नितीन खटके, बालाजी गावडे, राकेश पाटील, अतुल निर्मळ, सुहास पोळ, हेमंत शिंदे, पिंटू जाधव, निलेश पाटील, आदिनाथ माने, सुहास शिंदे, रणजीत कांबळे, धन्यकुमार गारुडी, पप्पू कांडेकर, अभिजीत म्हमाणे, शिवप्रताप खटके, बाळासाहेब घाडगे, संदिपान माने, वैभव मोहिते इत्यादी जण उपस्थित होते.



Post a Comment