Header Ads Widget

 


करमाळा-प्रतिनिधी
 
            करमाळा तालुक्यातील  आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचा ॲडव्हान्स कोणी कोणी घेतला आहे? त्या वाहन मालकांची यादी जाहीर करावी. असे दशरथआण्णा कांबळे यांनी चेअरमन धनंजय डोंगरे यांना आवाहन केले आहे. कारखान्याच्या बाबतीतले कोण-कोण 'छुपा रुस्तम' आहेत? संचालकांचे सुध्दा असे कोणते नातेवाईक कारखान्याच्या लुटारुंच्या यादीमध्ये दडून बसले आहेत. त्यांची यादी नाव आणि रक्कमे सहित जाहीर करावी. व अशी यादी जाहीर करुन, चेअरमन पदाची कारकिर्द खऱ्या अर्थाने गाजवावी. त्यानंतरच आपण कारखाना निवडणुकीत शेतकरी सभासदांपुढे जावे. कारखान्याचे साडेबारा कोटी रुपये जर लुटारुंकडे असतील, व ते वेळीच वसुल केले असते तर कारखाना तीन वर्षे बंद राहिला नसता. व बारा कोटी रुपयांची भिक मागायची वेळ संचालक मंडळावर आली नसती.

            चेअरमन धनंजय डोंगरे यांनी आदिनाथच्या लुटारुंची यादी जाहिर करावी. तुमचा जाहिर सत्कार करमाळ्यातील सुभाष चौकात शेतकरी कामगार संघर्ष समितीच्या वतीने करू. अशा प्रकारे कांबळे यांनी सांगितले आहे. कारखान्याच्या जबाबदार व्यक्तीनी नालायक लोकांना चुकीच्या पध्दतीने ॲडव्हान्स वाटप केला नसता, व वाटप केलेला ॲडव्हान्स योग्य वेळी व्याजासकट परत घेतला असता तर कारखान्याला इतरांपुढे भीक मागायची वेळच आली नसती. त्याचप्रमाणे कारखान्याने किती मालकांचे बोगस करार केलेले आहेत? किती वाहने बोगस दाखवलेली आहेत? हे सुध्दा डोंगरे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे जाहीर करावे असे दशरथआण्णा कांबळे यांनी आवाहन केले आहे.

Post a Comment