Header Ads Widget

 


करमाळा-प्रतिनिधी
 
           गेल्या दोन दिवसांपूर्वी करमाळा तालुक्यातून बऱ्याच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी, भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. अशा प्रकारच्या बातम्या प्रसार माध्यमातून मोठ्या प्रमाणात आल्या. व अशा प्रकारचा करमाळा तालुक्यातून भाजपामध्ये झालेला जाहीर प्रवेश, म्हणजेच राष्ट्रवादीला खूप मोठा धक्का मानला जात होता. परंतु कदाचित राष्ट्रवादीला हा धक्का मानणाऱ्या लोकांना हे माहीत नसावे की, राष्ट्रवादी ही कुणाच्या मालकीची नाही, ती व्यक्ती केंद्रित नाही. ती विचारांशी आणि जनमानसाच्या आवाजातून निर्माण झालेली पार्टी आहे. या पार्टीमध्ये विचारांशी आणि जनमानसाशी प्रामाणिक असणाराच व्यक्ती या ठिकाणी तग धरू शकतो. हे आजपर्यंतचा इतिहास सांगतो. या पार्टीमध्ये स्वार्थी आणि अप्पलपोटी लोकांना कोणतेही स्थान नाही. स्वार्थ आणि संधीसाधू लोकं याठिकाणी जास्त काळ टिकू शकत नाहीत. खऱ्या अर्थाने त्यांच्या संयमाचा आणि कार्यकर्ता होण्याचा कस येथे लागतो. 

          जे कार्यकर्ते राष्ट्रवादी सोडून गेले, अशा प्रकारे प्रसिध्दी माध्यमांनी बातम्या दिल्या. त्यातील बरेचसे कार्यकर्ते परत माघारी आले. त्यांचे मतपरिर्वतन करण्याचा सर्व बाजूने पुरेपुर प्रयत्न झाला. परंतु ते राष्ट्रवादीच्या विचारांपासुन डगमगले नाहीत. आता ज्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला, त्यांच्या राष्ट्रवादीच्या विविध शाखांवर नियुक्त्याच झाल्या नव्हत्या. त्यामुळे भाजपामध्ये कोणत्याही जबाबदार व्यक्तीचा प्रवेश झालेला नाही. राष्ट्रवादीने अशा कोणत्या ही व्यक्तीला जबाबदारी दिलेल्या नाही. त्यामुळे अशा लोकांचा आणि राष्ट्रवादीचा कोणता ही संबंध नाही. भाजपामध्ये प्रवेश केलेल्या व्यक्तीने त्यांची प्रतिक्रिया देताना सांगितले आहे कि, मी आधीपासुन भाजपाची शाखा असणाऱ्या बजरंग दलामध्ये काम केले आहे. त्यामुळे अशी व्यक्ती राष्ट्रवादीच्या धर्मनिरपेक्ष विचारांची असु शकेल का? याची वरिष्ठांना ही कदाचित शंका असेल म्हणुनच, वरिष्ठांनी सुध्दा अशा व्यक्तिला पक्षाच्या जबाबदारीपासुन दुर ठेवणे उचित समजले असावे. हे मात्र नक्की....


Post a Comment