आदिनाथ सहकारी साखर कारखान्या विषयी चाललेली कोल्हे कोई थांबवावी. अशी प्रतिक्रिया कर्मयोगी गोविंद बापू पाटील विचार मंचाचे अध्यक्ष संतोष पाटील यांनी दिली आहे. आदिनाथ सहकारी साखर कारखाना तीन वर्ष बंद होता. त्यावेळी आदिनाथ सहकारी साखर कारखाना मी सक्षमपणे चालवू शकतो म्हणणारे कुठे गेले होते? या चालू गळीत हंगामातील कमलाई व मकाई साखर कारखान्यातील शेतकऱ्यांचे चार ते पाच महिने झाले तरी ही शेतकऱ्यांना उसाची बिले अजून दिले नाही. त्यांनी आदिनाथ विषयी बोलू नये. आधी शेतकऱ्यांची बिले द्यावी आणि मगच आम्ही कारखाना चालवू म्हणणाऱ्यांनी आदिनाथ सहकारी साखर कारखान्या विषयी बोलावे. आदिनाथ सहकारी साखर कारखाना उभा करण्यासाठी सहकारातील ऋषीतुल्य त्यागी नेतृत्व कर्मयोगी गोविंद बापू पाटील, यांनी कारखाना उभारणीसाठी व कारखान्यातून साखर तयार होईपर्यंत पायामध्ये चप्पल घालणार नाही अशी भीष्म प्रतिज्ञा केली होती. आणि तब्बल 23 वर्षे पायामध्ये चप्पल घातली नाही. मुंबई, पुणे, सोलापूर सतत दौरे करून स्वतःच्या घरचा जेवणाचा डबा घेऊन कारखान्यासाठी अहोरात्र झटून आदिनाथ उभा केला. कर्मयोगी गोविंद बापू पाटील व माजी कार्यकारी संचालक हरिदास डांगे यांच्या अथक प्रयत्नातून आदिनाथ उभा राहिला. काही नथभ्रष्ट विघ्न संतोषी भ्रष्टपुढाऱ्यांमुळे कर्मयोगी गोविंद बापू पाटील व हरिदास डांगे यांना बाजूला करून, आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा भ्रष्टाचारांचा अड्डा बनला. आणि आदिनाथला दृष्ट लागावी अशी अधोगती होत गेली. आदिनाथ सहकारी साखर कारखाना गेली तीन वर्ष बंद पाडण्याचं पाप सत्ताधारी मंडळींनी केले. आणि बारामती ऍग्रो कंपनीला भाडेतत्त्वावर देण्याचा घाट सत्ताधारी मंडळींनी घातला. करारनामा झाला होता परंतु आदिनाथ महाराजांना ते पटलं नव्हतं. आदिनाथ महाराजांनी माजी आमदार नारायण पाटील यांच्या रूपाने रुद्र अवतार घेऊन बारामती ॲग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे, कर्मचारी व बँकेचे अधिकारी हे आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचा ताबा घेण्यासाठी आले होते. परंतु मा. आ. नारायण पाटील यांनी आपली सर्व ताकद पणाला लावून त्यांना तिथून पिटाळून लावले. आणि खरोखरच आदिनाथ वाचवण्याचे काम मा. आ. नारायण पाटील यांनी केले.



Post a Comment