पोथरे ता. करमाळा येथे अवैध धंदा आणि गावामध्ये अशांतता निर्माण करणाऱ्या व्यक्तीचा करमाळा पोलीसानी वेळीच बंदोबस्त करावा. अशी मागणी समस्त पोथरे ग्रामस्थांनी एकत्र येत, करमाळा पोलीस स्टेशन येथे निवेदनाद्वारे केली आहे. ह्या निवेदनावर १७६ ग्रामस्थांनी सह्या केल्या आहेत. तरी सदरील निवेदनामध्ये म्हटले आहे कि,
आम्ही मौजे पोथरे ता. करमाळा येथील सर्वजण कायमस्वरुपी रहिवाशी असुन, याच गावामध्ये कुटूंबासमवेत राहत आहोत. तरी एक युवक आमच्या गावामध्ये राहत असलेल्या, एका स्त्रीच्या चुकीच्या वर्तनाचा फायदा घेऊन तिच्यासोबत अनैतिक संबंध ठेऊन, गावामध्ये अशांतता प्रस्थापित करत आहे. तसेच गेले सात दिवसांपासुन आमच्या गावातील एका विवाहितेच्या स्वभावाचा गैरफायदा घेऊन, तिला व तिच्या लहान मुलीस फुस लावून गावातुन परपुरुष म्हणजेच, गावातील गैरवर्तन करणाऱ्या स्त्रीच्या भावाने अमिष दाखवून पळवून नेले आहे. तरी वरील इसम नेहमी गावामध्ये अशांतता प्रस्थापित करत असुन, त्याचे गावामध्ये अवैध दारुचे धंदे आहेत. त्यामुळे देखील गावामधील शांतता धोक्यात आली आहे. तरी वरील इसम हा गुंड व आडदांड प्रवृत्तीचा असुन, त्याने गेले महिन्याभरापुर्वी आमच्या गावातील दोन व्यक्तीना किरकोळ कारणावरुन मारहाण केली होती. तसेच तो गावामध्ये तलवारीचा धाक दाखवून, लोकांना जीवे मारण्याची धमकी देत दहशत निर्माण करत आहे. तरी वरील इसमाविरुद्ध योग्य ती कार्यवाही करुन, गावामध्ये कायदा व शांतता प्रस्थापित करावी. अशा प्रकारे संबंधित निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.
तरी या निवेदनावर गावातील प्रमुख व्यक्तींसह १७६ ग्रामस्थांनी सह्या केल्या आहेत.


Post a Comment