Header Ads Widget

 


 

करमाळा-प्रतिनिधी 
         दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुध्दा विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती आवाटी येथे मोठ्या उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली. जयंतीच्या कार्यक्रमासाठी भारिपचे देवा लोंढे, आवाटी गावचे सरपंच शाबीरभाई शेख, आवाटी सोसायटीचे राजूभाई शेख, डीसीसी बँकेचे मा. संचालक नसरुल्ला खान, नेरले ग्रा. पं. सदस्य काका पाटील, तनवीर शेख, बंडू पाटील, प्रकाश गायकवाड, महालिग गायकवाड इ.प्रमुख मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम उपस्थित सर्व मान्यवरांनी आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला व उपस्थित सर्वांनी बुध्दवंदना घेतली. त्यानंतर गावातील प्रमुख मार्गावरुन मिरवणूकीस सुरुवात करण्यात आली. या मिरवणूकीमध्ये महिलांचा ही मोठ्या प्रमाणात सहभाग दिसुन आला. शेवटी मिरवणूकीचा आनंदी व उत्साही वातावरणामध्ये समारोप करण्यात आला.

              सदरील कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले देवा लोंढे यांनी भीमअनुयायांना संबोधित करताना सांगितले कि, बाबासाहेबांनी जो बहुजन समाजाला मुलमंत्र दिला आहे. शिका, संघटीत व्हा, आणि संघर्ष करा. हा मुलमंत्र आत्मसात करुन सर्व बहुजन बांधवांनी स्वतःचा विकास करुन घ्यावा. व आवाटी गावामध्ये दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साही वातावरणात साजरी होते. परंतु या जयंतीमध्ये सर्व जाती-धर्मातील नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. ही अभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळे येथील सर्व ग्रामस्थांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. अशाप्रकारे लोंढे यांनी सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा देत, कौतुक केले. 

          मिरवणूकीच्या समारोपानंतर उपस्थितांना अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदरील कार्यक्रमाचे योग्य प्रकारे नियोजन करण्यासाठी प्रबुध्द ग्रुपचे शंकर गायकवाड, महालिग गायकवाड, भास्कर गायकवाड, दादा गायकवाड, दिलीप गायकवाड, राहुल गायकवाड, बाळा गायकवाड, शरद गायकवाड, मुकूंद गायकवाड, अनिल गायकवाड, सुमित गायकवाड, रोहिदास गायकवाड इत्यादी जणांनी परिश्रम घेतले.

Post a Comment