Header Ads Widget

 


करमाळा-प्रतिनिधी
            शिवजयंती उत्सव समिती देवळाली व राहुल कानगुडे-सुधीर आवटे मित्र परिवाराच्या वतीने देवळाली येथे भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबीराचे उद़्घाटन शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष महेश चिवटे, करमाळा पंचायत समितीचे मा. सभापती गहिणीनाथ ननवरे, पै. सतिश रघुनाथ कानगुडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. या भव्य रक्तदान शिबीरात 91 शिवभक्तांनी रक्तदान केले. यावेळी युवासेना ता.अध्यक्ष राहुल कानगुडे म्हणाले कि, आम्ही दरवेळेस शिवजयंतीच्या अनुषंगाने असे वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवत असतो. समाजातील पिडीत, दुर्लक्षित, दुर्बल घटकांना वैद्यकीय क्षेत्रामध्ये नेहमीच अडचण जाणवत असते. अशा नडलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी आम्ही सदैव तत्पर असतो. अशाप्रकारे आम्ही समाजा-समाजामध्ये शिवकार्य आणि शिवविचार पोहचविण्याचे काम वर्षभर करत असतो.

         सदरिल कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी पैलवान लखन शिंदे, पैलवान सचिन कानगुडे, दादा फुके, राज शेख, विशाल ढेरे, अक्षय कानगुडे, लखन आवटे, शिवम गोसावी, विशाल कानगुडे, सचिन कानगुडे, नागेश ढेरे, करण साखरे, स्वप्निल कानगुडे, करण आवटे, रोहन कानगुडे, सोमा साळवे, शुभम नलावडे, शुभम शिंदे तसेच सर्व शिवभक्तांनी परिश्रम घेतले.


Post a Comment