Header Ads Widget

 


करमाळा-प्रतिनिधी
         करमाळा शहरामध्ये १४ एप्रिल रोजी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती मोठ्या उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळेसची बाबासाहेबांची जयंती शहरामधील प्रमुख पाच मंडळांनी भव्यदिव्य देखावे सादर करत असताना, करमाळा तालुक्यातील नागरिकांना सोलापूर शहरामध्ये होत असलेल्या भव्यदिव्य जयंतीची काही प्रमाणात अनुभूती आल्याचे दिसून आले. या मिरवणुकीमध्ये प्रामुख्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समिती, शिव-फुले-शाहु-आंबेडकर समिती, भिमाई ग्रुप, सिध्दार्थ नगर व सुमंतनगर या मंडळांनी मिरवणुकीत सहभाग घेत, आकर्षक देखावे सादर करुन तालुकावासियांची मने जिंकली. 

            याच अनुषंगाने करमाळा शहर आणि तालुक्यामध्ये सुध्दा १४ एप्रिल च्या आधीपासुनच, विविध सामाजिक कार्यक्रम राबवून महामानवाला सर्वच ठिकाणाहून विविध माध्यमातुन अभिवादन केले जात होते. त्यामुळे बहुजन समाजामध्ये महापुरुषांच्या विचारांचे नाते घट्ट रुजत असल्याचे चित्र निर्माण होत असल्याचे पहावयास मिळाले.

                 शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा. हा बाबासाहेबांनी बहुजन समाजाला जरी मुलमंत्र दिला असला, तरी बाबासाहेबांचा हा विचार फक्त एका विशिष्ट जातीपुरताच आहे. आणि बाबासाहेब सुध्दा विशिष्ट एका जातीचेच आहेत. असा येथील समाजद्रोही राजकारण्यांनी बहुतेक समाजबांधवांचा समज निर्माण केला होता. परंतु विविध सामाजिक संघटना निरंतर बहुजन महापुरुषांचे विचार समाजामध्ये रुजविण्याचे काम करत असल्यामुळे, आज इतर समाजबांधव जातीच्या चौकटी तोडून, महापुरुषांच्या विचारांना अंगिकृत करत असल्याचे दिसून येत आहे. करमाळा शहरामध्ये सुध्दा विविध समाजबांधवांकडून महामानवाच्या विचाराचा जागर करत असताना कौतुकास्पद कार्यक्रम आयोजित केले गेले. करमाळा तालुक्यातील- शहरातील नागरिक, विविध संघटना व प्रशासनानेसुध्दा महामानवाच्या जयंतीत व मिरवणुकीत खुप मोलाचे सहकार्य केले. त्यामुळे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या वतीने आम्ही सर्वाचे मनपुर्वक आभार मानतो.
दशरथआण्णा कांबळे- अध्यक्ष, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समिती करमाळा

Post a Comment