करमाळा-प्रतिनिधी
करमाळा येथे शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने छत्रपती चौकातील महाराजांच्या पुतळ्याजवळ विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली. बहुजन समाजातील बहुसंख्य बांधव यावेळी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करुन, बाबासाहेबांच्या प्रतिमेस दशरथआण्णा कांबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपस्थित सर्व बहुजन बांधवांनी दोन्ही महापुरुषांना अभिवादन केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना कांबळे म्हणाले कि, देशामधील सध्याचे वातावरण जाती-जातीमध्ये तेड निर्माण करुन भांडणे लावून, राजकारणी त्यांची राजकिय पोळी भाजण्याचा प्रयत्न करताना दिसुन येत आहेत. परंतु समाजामधील विविध सामाजिक संघटना सतत महापुरुषांच्या विचारधारेचा प्रचार आणि प्रसार करत असल्यामुळे, सध्या तरी देशातील सामाजिक वातावरण स्थिर आहे. आणि अशा स्थितीमध्ये वेगवेगळ्या समाजातील समाजबांधवांनी सर्वच महापुरुषांची जयंती साजरी करुन, समाजद्वेष्ट्यांना ही बहुजन समाजाने दिलेली चपराक आहे. अशाप्रकारे कांबळे यांनी त्यांचे मनोगत मांडले. यावेळी मराठा सेवा संघाचे माजी ता.अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते सचिन काळे यांनी उपस्थितांना कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित 'शिवाजी कोण होता?' हे पुस्तक देऊन सन्मानित केले. यावेळी या कार्यक्रमासाठी शिवजयंती उत्सव समितीचे पदाधिकारी सचिन गायकवाड, सुनिल सावंत, मा.नगरसेवक महादेव आण्णा फंड, मा. नगरसेवक अतुल फंड, हरिभाऊ फंड, संभाजी ब्रिगेड संघटनेचे कुकडे, सचिन काळे, राष्ट्रवादी ता.अध्यक्ष संतोष वारे, ॲड. नवनाथ राखुंडे, बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब सुपनवर त्याचप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या विविध पदाधिकाऱ्यांनी सुध्दा यावेळी उपस्थिती लावली होती. यामध्ये ॲड. महादेव कांबळे, सौ, निलावती कांबळे, ॲड अनिल कांबळे, अर्बन बँकेचे मॕनेजर एस. पी. कांबळे, निलेश कांबळे, इ. पदाधिकाऱ्यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. सदरील कार्यक्रमासाठी तालुक्यातील विविध भागातुन बहुसंख्य मावळ्यांनी आणि भीमअनुयायांनी उपस्थिती लावली होती.



Post a Comment