केम-प्रतिनिधी (संजय जाधव)
केम तालुका करमाळा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जंयती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. हा कार्यक्रम येथील गांधी चौकात घेण्यात आला होता. १४ एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला महेश तळेकर सर, एपी ग्रुपचे अध्यक्ष अच्युत पाटील, माजी सभापती शेखर गाडे, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष विजयसिंह ओहोळ, सागर दौड, दादा पारखे, राहुल कोरे, पै. महावीर तळेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शुभम गाडे, मुनीराज पोळके, प्रणय देडगे, चकोर गाडे, दशरथ गाडे, योगेश ओहोळ, पत्रकार हर्षवर्धन गाडे त्याचप्रमाणे व्यापारी अमोल ओहोळ, विष्णू अवघडे, शिवाजी मोळिक, पांडुरंग तळेकर, पिंटू रायचुरे, नामदेव गाडे, वासकर उपस्थित होते.



Post a Comment