करमाळा-प्रतिनिधी
मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता असून सामाजिक न्याय विभाग तालुका उपाध्यक्ष म्हणून, मी पक्षाचे तालुकाध्यक्ष हनुमंत मांढरे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात प्रामाणिकपणे काम करत आहे. मी भाजप पक्षात प्रवेश केला म्हणून प्रसार माध्यम मधून माझे नाव प्रसिद्ध करण्यात आले आहे हे चुकीचे आहे. भाजप तालुका अध्यक्ष यांनी माझे मत परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला होता. पण मी त्यांच्या अमिषाला बळी पडणारा लाचार कार्यकर्ता नाही. शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांना माणनारा मी मावळा आहे. ज्या पक्षात आमच्या अस्मितेचा म्हणजे महापुरुषांचा अपमान होतो त्या पक्षात मी कसा जाईल. मी तत्वनिष्ठ कार्यकर्ता आहे. मांढरे- पाटील यांच्या सोबत प्रामाणिकपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे काम करत राहणार आहे.




Post a Comment