करमाळा-प्रतिनिधी
अधिक्षक अभियंता सोलापुर व कार्यकारी अभियंता बार्शी यांना वारंवार मोबाईल नंबरवर संपर्क करून देखील कोणतीही दखल न घेतल्यामुळे, संभाजी ब्रिगेडच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. संभाजी ब्रिगेडच्या वतीने शेतीपंपाची लाईट सुरळीत न झाल्यास कार्यकारी अभियंता बार्शी यास घेराव घालणार, व जेऊर कार्यालयास टाळा ठोक आंदोलन करणार. असल्याचा निवेदनातुन इशारा देण्यात आला आहे. रेल्वे क्रॉसिंग केबल खराब झाल्यामुळे, जनावरास व माणसांना पिण्यासाठी पाणी मिळत नसल्यामुळे हाल होत आहेत. गेल्या दोन महिन्यापासून लाईटची केबल खराब झाल्यामुळे, जेऊर विभागातील काही गावे व काही भाग रेल्वे क्रॉसिंग केबलमुळे बंद आहेत. त्वरित केबल दुरुस्त करून शेती पंपाच्या लाईटचा प्रश्न सोडवावा. अन्यथा जेऊर महावितरणास टाळे ठोक आंदोलन करण्यात येईल. व बार्शी येथील कार्यकारी अभियंता यांना घेराव घालण्यात येईल याची नोंद घ्यावी. अशाप्रकारचा निवेदनातुन इशारा देण्यात आला आहे. निवेदन देतेवेळी राकेश पाटील, अभिजीत म्हमाणे, हेमंत शिंदे, सुहास शिंदे, आदिनाथ माने, अजित उपादे, लक्ष्मण तोरमल, संतोष तोरमल, गणेश म्हमाणे, जगन्नाथ निमगीरे, प्रशांत निमगीरे, रामदास तोरमल, सुभाष जगताप इत्यादीजण उपस्थित होते.



Post a Comment