Header Ads Widget

 


करमाळा-प्रतिनिधी
 
         महात्मा जोतीराव फुले विद्यालय मोरवड ता.करमाळा या विद्यालयातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभासाठी प्रा. गणेश करे-पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. या शुभचिंतनाच्या कार्यक्रमाच्या वेळी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. बोलताना ते म्हणाले की ,माझा जन्म कोणत्या घरात व्हावा हे माझ्या हातात नाही ,माझा रंग कोणता असेल हे माझ्या हातात नाही ,माझा जन्म कोणत्या पंथात व्हावा हे माझ्या हातात नाही, माझा जन्म कोणत्या जातीत व्हावा हे माझ्या हातात नाही ,माझा जन्म कोणत्या राज्यात व्हावा हे माझ्या हातात नाही, माझा जन्म कोणत्या देशात व्हावा हे माझ्या हातात नाही, तळ हातावरच्या रेषा दाखवून भविष्य बघण्यापेक्षा तळ हाताच्या पाठीमागे असणाऱ्या खंबीर मनगटातून आपण भविष्य उभा करू शकतो. हे मात्र आपल्या हातात आहे, त्यासाठी खूप प्रयत्न करा, खूप कष्ट करा यश तुमचंच असेल. आई वडिलांची सेवा करा आई-वडिलांना कधीही विसरू नका. त्यांच्यामुळे आपलं भविष्य अतिशय उज्वल असेल, अशाप्रकारे उपस्थित विद्यार्थ्यांना संबोधित करताना करे-पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. 

          तसेच २६ जानेवारी २०२३ रोजी वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये त्यांनी केलेले आव्हान ग्रामस्थांनी पूर्ण केल्यामुळे, त्यांनी विद्यालयास ५१ हजार रुपये जाहीर केले. सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक नवनाथ मोहोळकर सर यांनी केले. यावेळी इयत्ता पाचवी ते नववी मधील अनेक विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना गोड  मिष्टान्न देण्यात आले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्गशिक्षक गणेश गायकवाड सर यांनी केले. आभार प्रदर्शन बाळासाहेब बनकर सर यांनी केले. यावेळी सर्व शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.


Post a Comment