Header Ads Widget

 


करमाळा-प्रतिनिधी
                  लोकनेते स्व. दिगंबरराव बागल मामा यांच्या 68 व्या जयंतीनिमित्त, करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणात भरविण्यात आलेल्या कृषी महोत्सवामध्ये, बार्शीचे आमदार व माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या हस्ते पत्रकार दिनेश मडके यांना आदर्श पत्रकारितेचा सपत्नीक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती राज्याचे मा. उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील तसेच मोहोळचे मा. आमदार राजन पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते.

         पत्रकार दिनेश मडके हे गेल्या 17 वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. त्यांनी दैनिक एकमत, दैनिक तरुण भारत, दैनिक लोकमत, दै. पुण्यनगरी अशा नावाजलेल्या विविध वृत्तपत्रांमध्ये वार्ताहर म्हणुन काम केले आहे. सदरील पुरस्कार दिनेश मडके यांना मिळाल्यामुळे त्यांचे विविध क्षेत्रातुन अभिनंदन होत आहे.

Post a Comment