Header Ads Widget

 


करमाळा-प्रतिनिधी
 
          राज्यातील शिंदे -फडणवीस सरकारने गुढीपाडव्यासाठी रेशनकार्ड धारकांना आनंदाचा शिधा देण्याचे ठरविले होते. रेशन दुकानावर शंभर रूपयात रवा, साखर, तेल ,हरभरा दाळ प्रत्येकी एक -एक किलो असे प्रमाण ठरवून देखील, गुढीपाडवा उलटून आठ दिवस झाले. तरी महाराष्ट्रातील रेशन दुकानांवर आनंदाचा शिधा पोहचलाच नाही. म्हणून सर्व सामान्य नागरीकांचा गुढीपाडवा गोड होण्याऐवजी कडूच झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाची आनंदाचा शिधा योजना फसवी व त्यात मोठ्या प्रमाणात घोटाळा असल्याचा जाहीर आरोप, भीम आर्मी संविधान रक्षक दलाचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केला आहे.

        पुढे बोलताना कांबळे म्हणाले की, गोरगरीबांना मराठी नववर्षाला महागाईची झळ नको. म्हणून महाराष्ट्र सरकारने 100 रूपयात आनंदाचा शिधा गुढीपाडवा व भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त देण्याची घोषणा मंत्रीमंडळाने केली होती. राज्यातील 1 कोटी 63 लाख शिधापत्रिका धारकांना त्याचा लाभ मिळणार होता. परंतू महाराष्ट्र सरकारने गोरगरिबांच्या तोंडाला पाने पुसली असुन, आनंदाचा शिधा योजनेतील घोटाळा बाहेर काढण्यासाठी याची सखोल चौकशी होणे अंत्यत गरजेचे आहे. अशी हि उत्तरेश्वर कांबळे यांनी मागणी केली आहे.

Post a Comment