Header Ads Widget

 


करमाळा-प्रतिनिधी
 
            शहरातील पाणीपुरवठा गेले 15 दिवसांपासुन कधी बंद तर कधी चालु अशी अवस्था झाली होती. गेल्या 15 दिवसांपासून नागरीक सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी वाट बघत होते. परंतु नगरपालिकेतील अधिकारी व महावितरण अधिकारी यांचे एकमेकांकडे बोटे दाखवायचे काम चालु होते. त्यामुळे नागरिक हैराण झाले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष संजयबापु घोलप यांची वर्तमान पत्र व सोशल मिडीयातुन नगरपालिकेतील अधिकारी यांनी टँकरद्वारे शहराला पाणी द्या. व लवकर पाणी पुरवठा सुरळीत करावा असा निर्वाणीचा ईशारा दिला होता. अन्यथा आंदोलन केले जाईल असे सांगितले होते.

         त्यानंतर त्वरित बातमीची दखल घेत पाणी पुरवठा आज पासून सुरळीत चालु झाला आहे. असे नगरपालिकेतील अधिकारी शेख यांनी मनसे तालुकाध्यक्ष संजय घोलप यांना फोनद्वारे माहिती दिली आहे. व भविष्यात असा प्रॉब्लेम येणार नाही अशी उपाय योजना करू असे सागितले. त्या नंतर संजय घोलप यांनी शेख यांना सांगितले कि, आमच्या शहरातील नागरीक खुप शिस्त प्रिय व माणुसकिचे आहेत. तुम्हाला व नगरपालिकेला सहकार्य करत आले आहेत. व भविष्यातही करतील अशी खात्री दिली....

Post a Comment