करमाळा-प्रतिनिधी
करमाळा शहराला केला जाणारा पाणी पुरवठा हा आठ दिवसांपासुन, कधी पाणी येते तर कधी नाही. तरी प्रशासकीय यंत्रना सदरील विषय जास्त गांभीर्याने घेते असे, कुठे ही दिसून येत नाही. त्यातच नगरपालिकेत सध्या प्रशासक असुन नगरसेवक पद हे अस्थिवात नाही. त्यामुळे जबाबदारी कोणी घ्यावयाची व जनतेने पण कोणाला प्रश्न विचारायचे? असे चित्र दिसुन येत आहे. त्यामुळे शहरातील जनता पुरती गोंधळलेल्या अवस्थेत दिसुन येत आहे. शहरातील सर्वसामान्य जनतेला नगरपालिकेच्या पाण्याशिवाय पर्याय नाही. मग हि जनता जाणार कुठे? श्रीमंतांच्या घरी पाण्याचे बोर तरी आहेत. तरी सर्वसामान्य जनतेचा विचार करता करमाळा नगरपालिका प्रशासनाने तात्काळ पाण्याच्या टँकरद्वारे प्रत्येक वार्डात पाणी उपलब्ध करून द्यावे. व शहरातील जनतेची होणारी गैरसोय त्वरित थांबवावी. अशा प्रकारची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कलामाळा ता. अध्यक्ष संजयबापु घोलप यांनी केली आहे. मागील काही महिन्यांपुर्वी करमाळा नगरपालिकेच्या विरोधात पाणी प्रश्नावर मा.नगरसेवक शौकतभाई नालबंद, ङॉ.अविनाश घोलप ,सचिन घोलप ,श्रीनिवास कांबळे, राजश्रीताई माने, श्रेणिकशेठ खाटेर, मुंकुंदतात्या कांबळे, विजय लावंङ, शेखर जोगळेकर, विजय पवार, पत्रकार संजय शिंदे, अविनाश जोशी आदि नगरसेवक व सामाजिक कार्यकर्त्यांनी पाणी प्रश्नावर ऐन सणासुदीच्या दिवसात होणारी गैरसोय व नागरिकांना होणारा नाहक त्रास, यामुळे नगरपालिकेला टाळे ठोकण्याचा ईशारा दिला होता. त्या अनुषंगाने संबंधित सर्वजण नगरपालिकेत गेले. परंतु त्याच्या विरोधात शासकीय कामात अडथळा म्हणून, प्रशासनाकडून कलम 353 हा गुन्हा दाखल करण्यात आला. जनतेच्या प्रश्नावर प्रशासनाशी भांडणाऱ्या नगरसेवक व लोकप्रतिनिधींवर जर असे गुन्हे दाखल केले जात असतील तर, हे जनतेच्या हितासाठी प्रशासकिय अधिकारी आहेत का? हा मोठा प्रश्न सर्वसामान्य जनतेमधून उपस्थित केला जात आहे. तरी करमाळा नगरपालिकेने शहरातील नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीकडे वेळीच लक्ष द्यावे. अन्यथा सर्वसामान्य जनतेला रस्त्यावर उतरण्यास जास्तीची वेळ लागणार नाही. आणि त्यावेळेस कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास, त्यास सर्वस्वी करमाळा नगरपालिका जबाबदार राहिल.



Post a Comment