करमाळा-प्रतिनिधी
करमाळा शहरातील नागरिकांना नगरपरिषदेच्या वतीने खुपच कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्यामुळे, शहरातील नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. त्याचप्रमाणे नागरिकांनी याबाबत नगरपालिकेतील मुख्याधिकारी व पाणी पुरवठा अधिकारी यांना याबाबत वारंवार तक्रारी करुन सुध्दा संबंधीत अधिकारी नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी उदासीन भुमिका घेत असल्याचे पहायला मिळत आहे. या सर्व बाबींची दखल घेत आम्ही सोलापूर जिल्हाधिकारी, पालकमंत्री सोलापूर, नगरविकासमंत्री महाराष्ट्र राज्य यांना ईमेल द्वारे शहरातील या परिस्थितीविषयी निवेदन सादर केले आहे. तरी सदरील निवेदनामध्ये असे सांगण्यात आले आहे कि, करमाळा नगरपरिषद हद्दीमध्ये राहत असलेल्या नागरिकांना, कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याबाबत याची वारंवार शहरातील नागरिकांनी मुख्याधिकारी, पाणीपुरवठा अधिकारी यांना सदरील बाब लक्षात आणुन दिलेली आहे. परंतु संबंधित प्रशासनिक अधिकारी या समस्येकडे जाणून-बुजून दुर्लक्ष करत असल्याचे जाणवून येत आहे. शहरातील नागरिकांना नगरपरिषद एक दिवसाआड पाणीपुरवठा करते. म्हणजे महिन्यातील फक्त पंधरा दिवस पाणीपुरवठा केला जातो. मात्र पाणीपट्टी प्रत्येक महिन्याला वसूल केली जाते. या अनुषंगाने पाणीपट्टी सुद्धा पंधरा दिवसाचीच वसूल केली जावी. नागरिकांना होत असलेल्या गैरसोयी बाबत तोडगा काढण्यास करमाळा नगरपालिका पूर्णतः अपयशी होताना दिसून येत आहे. व संबंधित अधिकारी ही नागरिकांच्या बाबतीत पुर्णपणे उदासीन दिसून येत आहेत. तरी शहरातील नागरिकांना भेडसावत असलेले प्रश्न मुख्याधिकारी यांनी वेळीच लक्ष देऊन सोडविले नाहीत तर, शहरातील युवक, महिला, पुरुष यांना सोबत घेऊन मोठ्या प्रमाणात आंदोलन केले जाईल याची दखल घ्यावी. अशाप्रकारची निवेदनातुन जिल्हाधिकारी, पालकमंत्री व नगरविकासमंत्री यांना मा. नगरसेविका सौ. सविता जयकुमार कांबळे यांनी तक्रार केली आहे.



Post a Comment