![]() |
घारगाव येथील विद्यमान सरपंच सौ. लक्ष्मी संजय सरवदे यांना स्वप्नल फाउंडेशन पुणे या संस्थेच्या वतीने दिला जाणारा, राज्यस्तरीय कर्तृत्ववान महिला नारी रत्न गौरव पुरस्कार, दि. १७/३/२०२३ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन पुणे महानगरपालिका डॉ. आंबेडकर रोड मालधक्का चौक मंगळवार पेठ पुणे या ठिकाणी सन्मानित करण्यात आले. स्वप्नल फाउंडेशन च्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रातील समाजदूतांना सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य विषयक, कला, क्रीडा सर्व क्षेत्रात उल्लेखनीय व भरीव योगदान देणाऱ्या, समाजदुतांना राज्यस्तरीय गुनिजन गौरव पुरस्कार दिला जातो.
मा पोलीस अधिकारी भानुप्रताप बर्गे, संदीप राक्षे, बाळकृष्ण नेहरकर, सिने अभिनेते प्रदीप देवकर यांच्या हस्ते सन्मानपत्र व सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी स्वप्नल फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा सौ. शोभाताई बल्लाळ, उपाध्यक्ष रवी सावंत, कार्याध्यक्ष मयूर बल्लाळ, आयोजक सौ. रुपाली जाधव, सई गोंधळेकर, उज्वला गायकवाड, सुजाता दळवी तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. सामाजिक कार्याची दखल घेत, स्वप्नल फाउंडेशन पुणे या संस्थेने घारगावच्या सरपंच सौ. लक्ष्मी संजय सरवदे यांना राज्यस्तरीय कर्तुत्ववान महिला नारी रत्न गौरव पुरस्कार देऊन गौरव केला आहे.
सदरील पुरस्कार मिळाल्याने घारगावचे माजी सरपंच किरण पाटील, मा. सरपंच अनिता राजेंद्र भोसले, उपसरपंच सतीश अंगद पवार, माजी सरपंच सौ. लोचना नागनाथ पाटील आणि ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय मस्तुद, आशा देशमुखे, कविता होगले, समस्त घारगावातील ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे.


Post a Comment