करमाळा नगरपरिषदेचे आरोग्य विभागाचे शहर स्वच्छतेचे काम न.पा. ठेकेदाराने दोन दिवसांपासुन बंद केले आहे. यामुळे शहरात ठिक-ठिकाणी घाण साचलेली दिसत आहे. सदर ठेकेदारावर शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी असुन, नगरपालिके बरोबर केलेल्या कराराचा भंग केला असल्यामुळे सदर ठेकेदारावर योग्य ती कार्यवाही करावी. अशी मागणी करमाळा नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका बानु जमादार यांनी मुख्याधिकारी बालाजी लोंढे यांच्या कड़े लेखी निवेदनाव्दारे केली आहे.
करमाळा नगरपरिषदेला जमादार यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सदर आरोग्य विभागाचा शहर स्वच्छतेचा ठेका विनीत पांडुरंग देवरे वेस्टेक बायोन्हेन्वर ग्रुप यांना दिला असुन, सदर ठेकेदाराने नगरपालिकेच्या नियम अटी शर्थी नुसार करार करून दिलेला आहे. त्याप्रमाणे शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदारावर असुन, गेल्या दोन दिवसांपासुन काम बंद ठेवुन शहराला वेठीस धरले आहे. शहरात विविध ठिकाणी घाण साचल्यामुळे रोगराई होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. यापुर्वी ही सदर ठेकेदाराने पंधरा दिवस काम बंद ठेवले होते. परंतु मुख्याधिकारी यांनी सदर ठेकेदारावर कुठली ही कार्यवाही केलेली नाही. शहर स्वच्छ ठेवणे ही अत्यावश्यक बाब असुन सदर ठेकेदारावर योग्य ती कार्यवाही करावी. अशी मागणी करमाळा नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका बानु जमादार यांनी केली आहे.
ठेकेदाराने करमाळा नगरपालिका अटी शर्थींचा भंग करुन दोन दिवसांपासुन शहरातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले असल्यामुळे, ठेकेदाराच्या दोन दिवसांच्या कामाचे बील अदा केले जाणार नाही. जे कर्मचारी सरकारी नाहीत त्यांना कामावर येण्याचे आम्ही आवाहन केलेले आहे. त्यानुसार इतर कर्मचारी कामावर हजर झाले आहेत.
बालाजी लोंढे- मुख्याधिकारी, करमाळा नगरपरिषद करमाळा


Post a Comment