छत्रपती शिवाजी तरुण मंडळाच्या वतीने उर्दू शाळेतील विद्यार्थीनी सोलापुर स्मार्ट उर्दू स्कूल मिशन २०२३ अंतर्गत, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हापरिषद विद्यार्थीनींसाठी आतंरशालेय प्रश्न मंजुषा स्पर्धेमध्ये करमाळा येथील, नगरपरिषद उर्दू शाळेतील विद्यार्थीनीने मोठया गटात हादीया जुबेर अहमद जनवाडकर व राफीया अकील शेख तसेच लहान गटात लायाजा अनिस कुरेशी व खदिजा अफजल कुरेशी यांनी तृतीय क्रमांक मिळविल्या बद्दल त्यांचा सत्कार ट्राॕफी, हार, श्रीफळ देऊन नगरसेवक संजय सावंत यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी करमाळा अर्बन बँकेचे माजी उपाध्यक्ष फारुक जमादार म.न.से.चे शहर प्रमुख नाना मोरे, मौलाना सिंकदर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मझहर नालबंद यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
यावेळी सांवत म्हणाले की, नगरपालिका उर्दू शाळेतील विद्यार्थीनीने जिल्हास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत उत्तुंग यश संपादन करून आपल्या गावाचे, शाळेचे नाव लौकीक केले आहे. यापुढे राज्य पातळीवर जाऊन जिल्ह्याचे नाव लौकीक करावे. अशी प्रकारची भावना सावंत यांनी बोलून दाखविली.
सदरील कार्यक्रमासाठी हाजी आसीफ शेख, आनंद रोडे, पांडुरंग सावंत, साजीद बेग, अकील शेख, अनिस कुरेशी आदी पालक वर्ग उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक जुबेर जनवाडकर यांनी केले.


Post a Comment