करमाळा-प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचा अंत महावितरण कंपनीने बघू नये कृषी पंपाची लाईट पुर्ववत करावी. अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष अण्णासाहेब सुपनवर यांनी केली आहे. करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना नोटीस न देता डीपी सोडवण्यात आले आहेत. आठ ते दहा दिवस झाले शेतकऱ्यांची कृषी पंपाची लाईट बंद केल्यामुळे, हाता-तोंडाशी आलेला शेतकऱ्यांचा घास या महावितरण च्या अधिकाऱ्यांमुळे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. करमाळा तालुक्यातील साखर कारखान्यांना अकराव्या महिन्यामध्ये ऊस गाळपासाठी गेलेल्या उसाचा अजून बिलाचा पत्ता नाही. शेतामध्ये कांदा, गहू, हरभरा, मका, ज्वारी अशी पिके उभी आहेत. सध्या शेतकऱ्यांकडे पैसा नसल्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. शेतामध्ये पिके जोमात आली आहेत. परंतु शेतकरी कोमात गेला आहे. महावितरण कंपनीने आता शेतकऱ्यांचा अंत पाहू नये. दोन दिवसांमध्ये कृषी पंपाची लाईट पुर्ववत करावा. जर लाईट जोडली नाही? तर बळीराजा शेतकरी संघटना रस्त्यावर उतरल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे मार्गदर्शक प्राचार्य नागेश माने, बळीराजा शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष भीमराव येडे, तालुका उपाध्यक्ष शिवाजीराव बनकर, अनिल तेली, नंदकुमार तांगडे, धनंजय शिंदे, वैजनाथ तरंगे, बळीराजा शेतकरी संघटनेचे तालुका युवा अध्यक्ष कल्याण कोकरे, तालुका उपाध्यक्ष नवनाथ कोळेकर, तालुका उपाध्यक्ष हनुमंत राऊत, निलेश पडवळे, समाधान मारकड आधी पदाधिकारी उपस्थित होते.



Post a Comment