Header Ads Widget

 


करमाळा-प्रतिनिधी
           करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी जणू काही तालुक्यातील जनतेच्या प्रश्नांकडे जाणून-बुजून कानाडोळा करून, त्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचा सपाटाच लावलेला दिसुन येत आहे. तालुक्यातील रस्त्याचे प्रश्न हे मोठ्या प्रमाणात आ वासून उभे आहेत. या रस्त्याचे प्रश्न आ. संजयमामा शिंदे यांनी सोडवावे अशी अपेक्षा सर्वसामान्य जनता करत आहे. अशा परिस्थितीमध्ये आमदारांनी गाव भेट दौरा सुरू केलेला आहे. आणि हा दौरा आमदारांनी त्यांच्या महागड्या गाड्यांमधून सुरु केलेला आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला अशा बिकट रस्त्यातून जात असताना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. याची प्रचिती आमदारांना कधी येणार?

                कारण ते ज्या गाड्यांमधून प्रवास करतात, त्या गाड्यांमधून आमदार साहेबांच्या पोटातील पाणीसुद्धा हालत नसणार आहे. त्यामुळे आमचे आ. संजयमामा शिंदे यांना सांगणे आहे की, आपला दौरा म्हणजे सर्वसामान्यांच्या जखमांवर मीठ चोळ दौरा सुरु आहे.

           आ. संजयमामा शिंदे तुमचा तीन वर्षातुन कुगाव येथे "तोंड दाखव दौरा" दोन दिवसांपूर्वी संपन्न झाला. परंतु आपण या ठिकाणच्या रस्त्याने प्रवास करणे टाळत, या गावात थेट लाँचने पुणे जिल्ह्यातून प्रवेश केला. मग येथील कुगाव, चिखलठाण, शेटफळ, केडगाव या लोकांनी तुमचा आदर्श घेऊन पुणे जिल्ह्यातूनच करमाळ्याकडे प्रवास करावा का? कुगाव येथे तुम्ही गाव भेट दौऱ्यासाठी आले होता. येथील ग्रामस्थांनी रस्त्याचा गहण प्रश्न मांडला असता, तुम्ही त्यांना उडवा-उडवीची उत्तरे दिली. व त्यांना सांगितले की सध्याचे सरकार स्थिर नाही. व राज्यामध्ये आपले सरकार नाही त्यामुळे तालुक्यासाठी निधी मिळवणे खूप कठीण होत आहे. अशा प्रकारची उडवा-उडवीची उत्तरे तुम्ही येथील ग्रामस्थांना दिली. परंतु याच दौऱ्यामध्ये पश्चिम भागातील मंजुर रस्त्याचा ठेकेदार तुमच्यासोबत तुमच्या दौऱ्यामध्ये होता. त्यामुळे अशा नालायक लोकांची तुम्ही जागीच कानउघडणी करणे गरजेचे होते. परंतु तुम्ही अशा ठेकेदारांना पाठीशी घालता. हे स्पष्टपणे जाणवून आले. त्यामुळे तुम्हाला जनतेची किती काळजी आहे? हे तरी निदान येथील लोकांना समजून आले. जर तालुक्याचा आमदार तालुक्यातील रस्ते बरोबर नाहीत. म्हणून इंदापूर, कालठण मार्गे लाँचने कुगाव येथे येत असेल. व करमाळ्यातून परत तुमच्या कार्यकर्त्यांना बोलवून तेथूनच माघारी फिरत असाल तर हे काही बरोबर नाही.

           आमदार साहेब तुम्ही कुगाव येथे गाव भेट दौऱ्या दरम्यान येथील ग्रामस्थांना सांगितले की सरकार स्थिर नाही. त्यामुळे निधी मिळवणे खूप कठीण जात आहे. मग येथील ग्रामस्थांना व आम्हाला ही प्रश्न पडतो की, जलजीवन योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेची कामे तुम्ही मोठ्या कष्टाने मंजुर केलेली असल्याप्रमाणे, मोठी प्रसिध्दी करत सांगता कि, करमाळा तालुक्यासाठी 94 कोटी 29 लाख निधी तुम्ही मंजूर करून आणला. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून करमाळा-माढा मतदारसंघातील ग्रामीण रस्त्याच्या मजबुती करणासाठी 38 कोटी 65 लाख निधी कोणत्या सरकारने मंजूर करून दिला? अशी अनेक कामे व अनेक उदाहरणे आम्ही तुम्हाला देऊ शकतो. परंतु राजकीय सुडापोटी जर तुम्ही जनतेची दिशाभूल करून फक्त देखावा करत, सर्वसामान्य जनतेच्या दररोजच्या हलाखीच्या जगण्याची चेष्टा व त्यांच्या जखमांवर मीठ चोळण्यासाठी गाव भेट दौरे करत असाल. तर ते राजकीय स्वार्थातून कधी ही यशस्वी होणार नाहीत. व तुम्ही तालुक्यामध्ये सध्या विकासाच्या नावाखाली जी जनतेची दिशाभूल सुरू केलेली आहे. त्याचे भविष्यकाळात निश्चितच तुम्हाला परिणाम दिसून येतील. तरी मा.आ. नारायण पाटील हे सुध्दा तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने जे काही कामे मंजूर करुन आणतील. ती कामे मंजुर झाली कि, लगेच तुम्ही कामे मंजुर झाली अशी प्रसिध्दी देऊन, आयत्या पिठावर रेगोठ्या मारण्यापेक्षा, आम्हीच आबांना सांगु की, तुम्ही जी काही तालुक्याच्या हिताच्या दृष्टीने कामे कराल. ती आठवडी आमदाराच्या नावावर प्रसिध्द करत जावा. जेणेकरुन तुम्हाला ग्रामस्थांच्या जखमांवर मीठ चोळ दौरे न करता, फक्त आठवडी बाजार करता येईल....


Post a Comment