Header Ads Widget

 


करमाळा-प्रतिनिधी
 
              गणेश नगर येथे शिवश्री वैभव माने- संभाजी बिग्रेड करमाळा शहर अध्यक्ष यांच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन संभाजी बिग्रेडचे राज्य प्रवक्ते शिवश्री गंगाधर बनबरे यांच्या शुभहस्ते मोठ्या थाटात पार पडले. उदघाटन प्रसंगी बोलताना शिवश्री गंगाधर बनबरे यांनी सांगितले की, आज समाजात महापुरुष आणि संतांच्या विचारांचा वारसा रुजविण्याची अत्यंत गरज आहे. वैभव माने यांच्या सारख्या नव तरुणांनी हा विचार जनमनात रुजविण्याचे काम हाती घेतले आहे हे खूप मोलाचे आहे. तरुण पिढीचे हे नैतिक कर्तव्य आहे आणि ते समाजाला मार्गदर्शक ठरू शकते.

         या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवश्री सचिन बापू जगताप- संभाजी बिग्रेड सोलापूर जिल्हाध्यक्ष हे होते. याप्रसंगी मराठा सेवा संघाचे माजी अध्यक्ष शिवश्री प्रा. नागेश माने, सचिन‌ जगताप, गणेश‌ सव्वाशे जि.संघटक, जि उपाध्यक्ष शंकर पोळ, मराठा सेवा संघ ता.अध्यक्ष अतुल वारे, ता.अध्यक्ष अमित घोगरे, ता. करमाळा शहराध्यक्ष वैभव माने ,संघटक गणेश डोके, कार्याध्यक्ष राजेश ननावरे, ता. संघटक मयुर सावंत, दत्ता करणे, चंदु माने, वंदेमातरम संघटनेचे अध्यक्ष शिवश्री बाळासाहेब जगताप, बळीराज संघटनेचे जिल्हाध्यक्ष आण्णा सुपनर, सामाजिक कार्येकर्ते सुनील गायकवाड, पत्रकार सुनील भोसले, रहेनुमा चॅरिटेबलचे उपाध्यक्ष इम्तियाज पठाण, मुस्तकीम पठाण, आझाद शेख, जिशान कबीर, दिगंबर बापू साळुंखे, माजी अध्यक्ष मराठा सेवा संघ शिवाजी बनकर, तालुका उपाध्यक्ष शेतकरी संघटना स्वप्नील देशमुख, उद्द्योजक प्रा. डॉ. शिवाजी दळवी, गोरख पवार प्रयोगशील शेतकरी, इंजिनीअर दिग्विजय देशमुख, मुख्तार काझी सर, आतार, शकील शेख, अशोक अडसूळ, बजरंग मेकॅनिक, सामाजिक कार्यकर्ते भंडारे साहेब तसेच विविध क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.नागेश माने यांनी केले. सूत्र संचलन शिवश्री गणेश डोके यांनी केले. तर उपस्थितांचे आभार कवी खलील शेख यांनी मानले.

Post a Comment