Header Ads Widget

 


करमाळा-प्रतिनिधी
              संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड यांच्या वतीने जेऊर येथे शिवजयंती मोठ्या उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या व सर्व महापुरुषांच्या प्रतिमेस वीर माता सोनाबाई काटे, आजी-माजी सैनिक यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थित आजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष अंकुर शिंदे, रवींद्र सव्वाशे, उपाध्यक्ष भास्कर आरकिले, शिवाजी खबाले, नितीन पवार, सोमनाथ शिरसकर, सुभाष मुटके, कल्याण कदम, आनंद पवार, कल्याणराव साळुंखे, भीमराव माने आदिजन प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
         सदरील कार्यक्रमात महिलांनी जिजाऊ वंदना म्हणून कार्यक्रमाची सुरुवात केली. लहान मुला-मुलींनी पोवाडे व पाळणा गीत गायले. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांवरती भाषणे हि संपन्न झाली. शांताबाई ननवरे या 80 वर्षाच्या आजीने भारदस्त आवाजामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवर गीत गायले. हर्षदा देशमाने यांनी भारदस्त आवाजामध्ये कविता सादर केली. श्रद्धा जगताप यांनी उत्कृष्ट आवाजात छत्रपती शिवरायांना डोक्यावर घेऊन जरूर नाचा, पण एकदाच ढाल-तलवारी, जाती धर्मा पलीकडचे शिवराय नक्की वाचा. तसेच शिवरायांच्या वेशभूषेमध्ये दिपराज नाईकनवरे यांनी सर्वांचे लक्ष वेधले. प्रथमेश झिंजाडे यांनी सर्व महापुरुषांवरती विचार मांडले. व आरोही तूपसमींदर, साई खटके, पूर्वा मोहिते, तेजस्विनी पाटील, नम्रता पाटील, पेरणा शिंदे, स्वरा निर्मळ, ऋषिकेश शिंदे, स्वरा आवटे यांनी छत्रपती शिवरायांवरती आपले विचार व्यक्त केले. यावेळेस महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. महापुरुषांच्या विचारांची पुस्तके देऊन उपस्थितांचा सन्मान करण्यात आला. सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब तोरमल यांनी केले. या कार्यक्रमाचे नियोजन पुणे विभागीय कार्याध्यक्ष, नितीन खटके व सर्व संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्ते तसेच शिवजंयती समितीच्या सर्व पदाधिकारी व ग्रामस्थांनी केले होते.

Post a Comment