Header Ads Widget

 


करमाळा-प्रतिनिधी
              हिसरे येथील संविधान चौकात कुळवाडी भुषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 393 व्या जयंतीनिमित्त, हिसरे गावचे प्रथम नागरिक नवनियुक्त सरपंच नवनाथ जगदाळे, उपसरपंच गणेश जगदाळे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी युवा नेतृत्व राजेश पवार बहुजन समाज पार्टी करमाळा विधानसभा यांनी त्यांचे विचार मांडताना सांगितले कि, छत्रपती शिवरायांचा विचार आजच्या युवा पिढीसमोर मोठा आदर्श निर्माण करणारा आहे. तसेच  नवसमाज निर्मितीसाठी खऱ्या अर्थाने छत्रपती शिवराय-फुले-शाहू-डॉ.आंबेडकर यांच्या विचाराची समाजाला गरज आहे. व त्यासाठी आपण सर्वजण प्रयत्नवादी राहून कार्य केले पाहिजे. असा आशावाद यावेळेस त्यांनी व्यक्त केला.
          या कार्यक्रमाला हिसरे गावचे माजी सरपंच व सध्याचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ ठोंबरे, गजेंद्र सातपुते, गौतम ओहोळ, दिलीप ओहोळ, रघुनाथ पवार, विलास भोसले, झुंबर पवार ,युवा कार्यकर्ते छोटू पवार, अशोक पवार, दिपराज भोसले, समाधान जगदाळे, दत्ता राऊत, अतुल जाधव, चंद्रकांत जगदाळे, सोमनाथ ननवरे, संजय खटके, यांच्या सह हिसरे गावातील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. सदर शिवजयंती चे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटी भिमनगर हिसरे यांच्या वतीने करण्यात आले होते.

Post a Comment