रोशेवाडी ग्रामपंचायत उपसरपंच पदी सौ. ललिता नाना रेगुडे यांची सरपंच नंदा विक्रम धायतोंडे यांच्या अध्यक्षतेखाली बिनविरोध निवड करण्यात आली. सदरची उपसरपंच पदाची निवड बिनविरोध झाल्याबद्दल, त्यांचा रिपाइं सोलापूर जिल्हा अध्यक्ष तथा रोशेवाडी ग्रामपंचायत सदस्य यशपाल कांबळे यांनी सत्कार केला. व पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा देत, गावच्या विकासाला आपल्याला मिळालेल्या पदाच्या माध्यमातुन आणखी गतिमान करुन, लोकसेवा करुन आपला नावलौकिक कमावावा. अशी अपेक्षा कांबळे यांनी यावेळेस व्यक्त केली.
या सत्कार प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य ज्ञानदेव पवार, सदस्य किशोर कांबळे, सदस्य लंकाबाई अण्णा थोरात, सारिका शिवाजी चव्हाण, ग्रामसेवक सौ. स्वाती जाधव, पोलीस पाटील अण्णा पवार, गावचे ज्येष्ठ नागरिक संदीपान नाळे, दादा सुरवसे, नवनाथ रेगुडे, गौतम कांबळे, संदीप रेगुडे, सतीश कांबळे, श्रीराम रेगुडे, सागर मोरे, आल्हाट, सागर मोरे ग्रामपंचायत शिपाई रोहिदास आदी मान्यवर उपस्थित होते.


Post a Comment