करमाळा-प्रतिनिधी
सर्पतज्ञ नीलिमकुमार खैरे गौरव पुरस्काराने महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातील सर्पमित्रांचा गौरव करण्यात आला. यामध्ये करमाळा मधील सर्पमित्रांचा समावेश होता. वन्य पशु-पक्षी संरक्षण सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, सांगवी, पुणे. या संस्थेच्या वतीने नटसम्राट निळूभाऊ फुले नाट्यगृह नवी सांगवी पुणे येथे निसर्ग संरक्षण, वन्यजीव व पक्षी तसेच शास्त्रीय पद्धतीने सर्प अभ्यास व सर्प बचाव कार्यासाठी, राज्यातील सर्प रक्षकांसाठी एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. पुरस्कार सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे सुनील लिमये (प्रधान मुख्य वनसंरक्षक, वन्यजीव, (निवृत्त) महाराष्ट्र राज्य) हे उपस्थित होते. तर सर्पतज्ञ डॉ. नीलिमकुमार खैरे यांनी मोलाचे असे मार्गदर्शन केले. यावेळी करमाळा तालुक्यातील सर्पमित्र प्रशांत भोसले, सर्पमित्र गणेश शेळके, सर्पमित्र राहुल घाडगे, सर्पमित्र माधव हनपुडे, सर्पमित्र प्रशांत विधाते, सर्पमित्र साधू जगताप, सर्पमित्र सीताराम चांगण व करमाळ्यातील सर्पमैत्रिण पूनम डोलारे व सर्पमैत्रीण अनुराधा राऊत यांना ही पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.



Post a Comment