Header Ads Widget

 


करमाळा-प्रतिनिधी
           74 व्या भारतीय प्रजासत्ताक दिन दि.26/1/2023 रोजी उत्साहात साजरा करण्यात येणार आला. यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते  जि.प.प्राथमिक शाळा आदिनाथनगर येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला. तरी या कार्यक्रमाचे औचित्य साधून आदिनाथ मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची वाटप करण्यात आले. आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांच्या मुलांच्या मार्फत, येणाऱ्या भावी काळामध्ये अशाच सामाजिक कार्यांमध्ये या सर्व युवकांचा सहभाग कायम राहिल. अशा प्रकारे आदिनाथ मित्र मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आश्वासन दिले.      
       यावेळी या कार्यक्रमासाठी सागर साखरे सर, नाथा चिंचकर, रवी माळवे, दीपक वाघे, संभाजी घोगरे, सुळ बंधू, काशीद बंधू, ऋषी जानकर, अजय आरकिले, अक्षय पोळ, भिवा शिंदे, बंटी जगताप, अजय शिंदे, साहिल पवार, सौरभ जाधव, शंकर मांढरे, ओंकार खरात, मयूर गुंजाळ, विशाल बाळशंकर, गोविंद गवळी, महामुनी राज, बापू लोंढे, आप्पा भोसले इत्यादींचे मोलाचे सहकार्य लाभले. आजच्या प्रजासत्ताक दिन या कार्यक्रमास विद्यार्थ्यांच्या पालक वर्गाने मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.

Post a Comment