करमाळा-प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील जनतेची अशादायक असणारी आमसभा गेल्या दहा वर्षपासून झालीच नाही. ही आमसभा होणे अतिशय गरजेचे असून, अधिकारी वर्गात सुस्ती आलेली दिसून येत आहे. तालुक्यातील जनतेचा दुवा म्हणजेच विद्यमान आमदार, ज़िल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगर पालिका, नगरसेवक याची आतुरतेने वाट पहात आहेत. जनता व अधिकारी-पदाधिकारी यांचा महत्वाचा दुवा म्हणजेच ही आमसभा होय!!!! विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यांचा चालू असलेला दौरा हा गोरगरीब जनतेसाठी उपयोगी नसून, तो एक शिंदे गटाचा कार्यकर्ता दौरा घडून येत आहे. विरोधी गटाच्या जनतेस हा दौरा काही ही उपयोगी होत नसून नुसतीच दिशाभूल होत आहे. तालुक्याच्या ठिकाणी आमसभाच घ्यावी अशी मागणी मनसेचे तालुका अध्यक्ष संजय घोलप यांनी केली आहे. गेल्या दहा वर्षांपासून आमसभा झालेली नाही. त्यामुळे तालुक्यातील जनतेचे बरेच प्रश्न वैयक्तिक व सार्वजनिक प्रलंबित असून, त्या संदर्भात अधिकाऱ्यांना जाब विचारून प्रश्न मार्गी लावणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे आमसभा झालीच पाहिजे!!! अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना करमाळा तालुका व शहरच्या वतीने करण्यात आली आहे.




Post a Comment