Header Ads Widget

 


करमाळा-प्रतिनिधी
 
          सोमवार, दि.२३/०१/२३ करमाळा शहरातील ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट मध्ये महिला पालकांसाठी काव्य मैफिल व हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी निमंत्रित कवी म्हणून कवी प्रकाश तात्या लावंड, कवी दादासाहेब पिसे, कवी खलील शेख, कवियत्री डॉ.सौ.चारू देवकर, कवी हरिभाऊ हिरडे यांना खास आमंत्रित केले होते. यावेळी निमंत्रित कवींना ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट तर्फे विशेष सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. सर्वांच्या बहारदार कवितांनी उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. तसेच इन्स्टिट्यूट मधील शिक्षिका प्रा. सौ. शितल वाघमारे मॅडम यांनी ही आपल्या बहारदार रचना सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. 

            या कार्यक्रमासाठी तालुक्यातील 100-150 महिलांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली. यावेळी संस्थेचे सर्व शिक्षक उपस्थित होते. सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी खलील शेख यांनी केले. तर आभार प्रा.महेश निकत सर यांनी मानले.



Post a Comment