Header Ads Widget

 


करमाळा-प्रतिनिधी
 
           स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूल मध्ये 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळी सचिव/मुख्याध्यापिका धनश्री जयंत दळवी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष/संस्थापक जयंत रामचंद्र दळवी यांनी प्रमुख उपस्थिती लावली होती. यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते भारतमाता, महात्मा गांधी, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. 

               या राष्ट्रीय कार्यक्रमासाठी शिक्षक सीमा कोरडे, हेमा शिंदे, शिवांगी कांबळे, कोमल बत्तीसे, पल्लवी माळवे, शुभांगी खळदकर, अंजुम कांबळे, फरहाणा खान, सविता पवार, रोहिणी गरड, श्रद्धा गांधी, कृष्णा पवार, राहुल पलंगे, बाबा तांबोळी, अंकुश नाळे हे उपस्थित होते. मनोगत शुभम चव्हाण, रुद्र चव्हाण, कार्तिक कोरडे, आराध्या कांबळे, हर्षदा बनकर, आदित्य झाडबुके, अमोदिनी सांगडे, अद्विता झालटे, साजिरी कोळी या मुलांनी केले. व सूत्रसंचालन सीमा कोरडे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी मुलांना बिस्कीट व चॉकलेट देऊन कार्यक्रम संपन्न करण्यात आला.

Post a Comment